Breaking
ई-पेपरराजकिय

*जिल्हा बँक निवडणूक : प्रशांत लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गावोगावी भेटीगाठी*

*कुरणपूर,फत्तेबाद,मांडवे,उक्कलगाव व बेलापूर येथे मतदारांशी थेट संपर्क साधत मतदानाचे आवाहन!*

0 9 5 0 2 3

जिल्हा बँक निवडणूक : प्रशांत लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या गावोगावी भेटीगाठी

*कुरणपूर,फत्तेबाद,मांडवे,उक्कलगाव व बेलापूर येथे मतदारांशी थेट संपर्क साधत मतदानाचे आवाहन!*

नेवासे (प्रतिनिधी) –

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, अहिल्यानगरच्या सन २०२६-२०३१ या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार परिवर्तन मंडळाचे अधिकृत उमेदवार प्रशांत सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, lकार्यकर्ते व मित्रमंडळ सक्रिय झाले आहेत.
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती राखीव मतदारसंघातून निवडणूक लढविणारे प्रशांत लोखंडे हे तरुण व उच्चशिक्षित उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांकडून जनसंपर्क मोहीम राबविण्यात येत आहे. बँकेचा पारदर्शक कारभार, सहकार क्षेत्राचा विकास आणि सभासदांच्या प्रश्नांना प्राधान्य या मुद्द्यांवर मतदारांशी संवाद साधला जात आहे.
या प्रचार मोहिमेत शिवसेनेचे जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश तांबे,बांधकाम कामगार सेनेचे जिल्हाप्रमुख विशाल शिरसाठ,युवासेना तालुकाप्रमुख संदिप दातीर,शेतकरी सेनेचे कैलास भनगे, तसेच भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
सोमवार,दि.२६ ऑक्टोबर रोजी या पदाधिकाऱ्यांनी कुरणपूर, फत्तेबाद, मांडवे, उक्कलगाव व बेलापूर या गावांमध्ये मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. यावेळी प्रशांत लोखंडे यांच्या उमेदवारीची माहिती देत सहकार परिवर्तन मंडळाच्या भूमिकेबाबत मतदारांशी चर्चा करण्यात आली.

२ नोव्हेंबर रोजी मतदान

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीत सहकार परिवर्तन मंडळाचे अधिकृत उमेदवार प्रशांत सदाशिव लोखंडे यांचा अनुक्रमांक २ असून निवडणूक चिन्ह ‘छत्री’ आहे. सोमवार, दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार असल्याची माहिती प्रचारादरम्यान मतदारांना देण्यात येत आहे प्रशांत लोखंडे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गावोगावी संपर्क मोहीम राबवत असून, आगामी काळातही मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला जाणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे