Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपर

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवालीची घवघवीत कामगिरी; इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ७५ टक्के यश*

0 8 9 9 1 8

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंतरवालीची घवघवीत कामगिरी; इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत ७५ टक्के यश*

नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंतरवाली येथील विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी प्राथमिक शिष्यवृत्ती (PSS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. यंदाच्या परीक्षेत शाळेतील १६ विद्यार्थ्यांपैकी १२ विद्यार्थी पात्र ठरले असून, शाळेने तब्बल ७५ टक्के निकालाची नोंद केली आहे.
या यशामध्ये स्वरांजली तोडमल हिने २६४ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या पाठोपाठ श्रावणी नागड (२६२), संस्कृती चोपडे (२५८), श्रावणी कोळते (२३०), अभय दरंदले (२३०), आरोही लोढे (२२८), भाग्यश्री कोकुंडे (२२०), अस्मिता नागड (२०६), समर्थ पवार (२०४), देवांश देशमुख (१७४), वैश्णवी बावळे (१५८) आणि उत्कर्ष बावळे (१५४) यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवली.
याशिवाय श्रद्धा नागड (१४०), सिद्धार्थ लोढे (११८), तनया वाबळे (१०६) आणि श्रीराज बावळे (७८) यांनीही उल्लेखनीय गुण मिळवत चांगली कामगिरी केली.
नवीन शाळा असूनही सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांचा नियमित सराव, शिक्षकांचे नियोजन आणि पालकांचे सहकार्य यामुळे हा यशस्वी निकाल शक्य झाल्याची भावना शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केली. “सुरुवात कधीही आणि कुठूनही करता येते; फक्त प्रामाणिक प्रयत्न आणि जिंकण्याची जिद्द असावी लागते,” हा शाळेचा संदेश या निकालातून सार्थ ठरला आहे.
या यशासाठी मुख्याध्यापक श्री. रविंद्र पानगिरे तसेच मार्गदर्शक शिक्षिका श्रीमती लतिका कोलते आणि श्रीमती तेजश्री निमसे यांनी विद्यार्थ्यांकडून घेतलेले परिश्रम विशेष ठरले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवत शाळेचा नावलौकिक वाढविला.
या घवघवीत यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि शाळा व्यवस्थापनावर तालुकाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, अंतरवाली ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांच्या या यशाचा अभिमान व्यक्त केला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे