जलजीवन कामाबाबत लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विभागाची आढावा बैठक घेणार :-आ.लंघे पाटील
जलजीवन कामाबाबत लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सर्व विभागाची आढावा बैठक घेणार :-आ.लंघे पाटील
नेवासा प्रतिनिधी –
नेवासा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांकडून जलजीवन कामांबाबत मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सर्वच विभागांची आढावा बैठक होणार असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे यांनी दिली.
आ. विठ्ठलराव लंघे बोलताना म्हणाले नेवासा तालुक्यातील विविध गावांतील कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून जलजीवन मिशन योजनेसह विविध शासकीय विभागांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी माझ्याकडे येत आहेत.
पुढे बोलताना म्हणाले की सर्वसामान्यांची कामे लवकरात लवकर व वेळेत व्हावीत, वैयक्तिक लाभाच्या योजना घरकुल व शासनाच्या निधींचा योग्य वापर होणारी कामे दर्जेदार होण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे असे आ. लंघे यांनी सांगितले.