मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आशाताई मुरकुटे सरसावल्या..
तरवडीत महिला मेळावा सपन्न..
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आशाताई मुरकुटे सरसावल्या..
तरवडीत महिला मेळावा सपन्न..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना मिळणार असल्याने महिलांचे सक्षमीकरण होणार असल्याचे प्रतिपादन मा जिल्हा परिषद सदस्या आशाताई मुरकुटे यांनी केले तरवडी तालुका नेवासा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे मार्गदर्शन व फॉर्म वाटप त्यांच्या हस्ते करण्यात आले. या योजनेसंदर्भात लागणारे कागदपत्रांची मार्गदर्शन व येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तरवडी येथे महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर नेवासा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ कचरे युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तुकाराम कन्हेरकर ह. भ. प. रामनाथ महाराज काळेगावकर,सरपंच स्वप्नाली क्षीरसागर, युवक चे महेश क्षीरसागर,माजी उपसरपंच अरुण चोपडे, बाप्पुसाहेब कचरे,सरचिटणीस अनिकेत भारस्कर उषाताई पवार, निर्मला गवळी, इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण ही अत्यंत महत्त्वाची योजना राज्यातील २१ ते ६५ वय वर्ष असलेल्या महिलांसाठी सुरू केली असून या योजनेद्वारे राज्यातील
पात्र महिलांना शासनाच्या नियम व अटीनुसार जुलै २०२४ पासून महिन्याला १५०० रुपये मिळणार आहे त्यामुळे शासकीय निकषानुसार पात्र महिलांनी स्वतःचे आधार कार्ड, रेशन कार्ड, जन्मदाखला , मतदान कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, यापैकी एक आवश्यक उत्पन्न दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड अर्जदार हमीपत्र बँक पासबुक स्वतःचा फोटो आदी आवश्यक त्या कागदपत्रासह सेतू केंद्र, ऑनलाईन संगणक प्रणाली, मोबाईल अॅप, या माध्यमाचा वापर करत लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. विशेष म्हणजे या योजने करिता ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत
वाढविण्यात आली असून पात्र महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज केला तरी तिला जुलै या महिन्यापासूनच शासकीय नियम व अटीनुसार १५०० रुपये चा आर्थिक लाभ सुरू होणार आहे तसेच पाच एकर शेतीची अट देखील शासनाने रद्द केल्याने सरसकट सर्व पात्र शेतकरी महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच आपल्या घरातील पात्र २१ वर्षीय एक अविवाहित मुलीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे
या योजनेसाठी रेशन कार्ड तसेच येणाऱ्या अडचणींबाबत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क करण्याचे आवाहन आशाताई मुरकुटे यांनी केले आहे
कायक्रमाप्रसंगी सकाहरी बागडे, शांताराम दरवडे, मुबारक शेख, दीपक दरवडे, बाबासाहेब इंगळे, कैलास गवळी पोलीस पाटील विकास भागवत, जेष्ठ अशोकराव क्षीरसागर, दिवाकर इंगळे, सतीश साळवे, किशोर भारस्कर, सयाजी कण्हेरकर, अर्जुन कण्हेरकर, गणेश खळेकर, सचिन दरवडे, छगन दळवी, तसेच कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका, अशा सेविका, बचत गटाच्या महिला सदस्या आदिसह दोनशेहुन अधिक महिला उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ कचरे यांनी केले तर आभार बाळासाहेब क्षीरसागर यांनी मानले.