Breaking
ई-पेपरब्रेकिंग

विधवांना सौदाळा ग्रामपंचायत कडून १००० रु रक्षाबंधन.

0 6 0 4 8 1

विधवांना सौदाळा ग्रामपंचायत कडून १००० रु रक्षाबंधन

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील विविध योजना राबविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतने रक्षाबंधन निमित्त आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी व कोरोनातील विधवा महिलांना एक हजार रुपये देण्याचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी ठरविले असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले

मागील दोन वर्षापासून आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नी व कोरोना विधवांना दिवाळीनंतर भाऊबीज साठी एक हजार रुपये सौंदाळा ग्रामपंचायतच्या वतीने देण्यात येत आहेत यावर्षी रक्षाबंधन साठी एक हजार रुपये व भाऊबीज निमित्त दोन्ही सणानिमित्त एक हजार रुपये असे एका वर्षात दोन हजार रुपये रक्कम देण्यात येणार आहे

सदरची रक्कम ग्रामनिधी मधून देण्यात येणार आहे

महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुटणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सौंदळा ग्रामपंचायतच्या या योजनेची परिसरातून कौतुक होत आहे.

2/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 4 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे