*सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष*
*नेवाशाच राजकारण चांगलंच तापलंय*

सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा; शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष…
जरकारण तापतंय..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील ज्ञानेश्वर व मुळा दोन सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका सध्या चांगल्याच रंगात आल्या आहेत. प्रमुखांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका-टिप्पणी आणि राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू आहे. मात्र, या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, कारखान्यांची आर्थिक स्थिती, एफआरपीची नुसार भाव अदा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सभासदांच्या हिताच्या योजनांबाबत फारशी चर्चा होताना दिसत नाही.
निवडणुकीच्या प्रचारात विरोधकांवर भ्रष्टाचार, गैरव्यवहार, नातेवाईकवाद आणि कारखाना प्रशासनातील त्रुटींचे आरोप केले जात आहेत. परंतु निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी कोणते ठोस धोरण राबवणार, याबाबत स्पष्ट भूमिका अनेक उमेदवारांकडून मांडली जात नसल्याची भावना सभासदांमध्ये आहे.
सहकार क्षेत्र हे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी उभे राहिले असताना आज निवडणुका राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनल्या आहेत. त्यामुळे कारखान्यांच्या विकासापेक्षा राजकीय वर्चस्वाच्या लढाईला अधिक महत्त्व दिले जात असल्याची चर्चा शेतकरी वर्गातून होत आहे.
निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांना प्राधान्य, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना दुय्यम स्थान.
एफआरपी वेळेत देण्याबाबत ठोस आश्वासने नाहीत.
ऊस तोडणी व वाहतूक व्यवस्थेतील अडचणींवर चर्चा कमी.
कारखान्यांची आर्थिक पारदर्शकता हा मुख्य मुद्दा व्हायला हवा.
सभासदांना अधिक लाभांश व कल्याणकारी योजनांबाबत स्पष्टता नाही.
आधुनिक तंत्रज्ञान व इथेनॉल प्रकल्पांबाबत ठोस दृष्टीकोन अपेक्षित.
युवक व नव्या सभासदांना व्यवस्थापनात संधी देण्याची गरज.
राजकारणापेक्षा शेतकरी हित आणि कारखान्याचा विकास महत्त्वाचा.
निवडून येणाऱ्या संचालकांनी उत्तरदायित्व स्वीकारणे आवश्यक.
सहकार क्षेत्राची मूळ उद्दिष्टे जपण्याची गरज.
संपादकीय –
“साखर कारखान्यांच्या निवडणुका जिंकणे महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्यांचा विश्वास जिंकणे त्याहून अधिक महत्त्वाचे आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका मांडणारे नेतृत्वच सहकार क्षेत्राला नवी दिशा देऊ शकते.”




