नेवाशातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश गडाख गटाला मोठा धक्का.
नेवाशातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
गडाख गटाला मोठा धक्का.
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
प्रतिनिधी नेवासा विधानसभा मतदार संघातील शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार शंकरराव गडाख यांना मानणारे जवळपास १५० कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मा आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे नेतृत्व मान्य करत नेवासा तालुका भाजपा पक्षात प्रवेश केला असून या पक्ष प्रवेशामुळे आ.गडाख गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
स्वंतत्र नेवासा विधानसभा मतदारसंघात आ. गडाख व मा आ. मुरकुटे यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले डॉ सुजय विखे पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे व मा आ बाळासाहेब मुरकुटे यांच्या उपस्थितीत नेवासा तालुका भाजपा पक्षात प्रवेश करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने जेऊर हैबती येथील प्रशांत भाऊ गडाख यांची कट्टर समर्थक तथा माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे निकटवर्तीय शरदराव शिंदे पाटील, भेंडा- शिवसेना माजी तालुका उपअध्यक्ष संजय मिसाळ, पाचेगाव-ज्ञानेश्वर शेळके, कुकाणा- मच्छिंद्र कचरे मा.ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रवरासंगम येथील शंकरराव गडाख यांची कट्टर समर्थक दीपक आवाळे यांचासह तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतल्याने विद्यमान आमदार शंकरराव गडाख गटाला विधानसभेच्या तोंडावर मोठा धक्का मनला जात असल्याची प्रतिक्रिया जेऊर हैबती येथील शरदराव शिंदे यांनी दिली आहे.
………………………………,…………………………………
माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यावेळी बोलताना म्हणाले की, पालकमंत्री या नात्याने राधाकृष विखे पाटील यांनी नेवासा तालुका दत्तक घेऊन, यापुढे आम्हाला ताकत देण्यासाठी खंबीरपणे उभे राहावे अशी मागणी त्यांनी केली..
……………………………………………………………….