ऊस उद्दपादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी स्वामी समर्थ साखर कारखाना यंदा चालू होणार..
ऊस उद्दपादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी स्वामी समर्थ साखर कारखाना यंदा चालू होणार..
नेवासा प्रतिनिधी- (मंगेश निकम)
(स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इं. ली चा गळित हंगाम १ ऑक्टोबर २०२४ ला चालू होणार मा.ना.श्री. विजय (बाप्पू) शिवतारे……..)
रविवार आज रोजी स्वामी समर्थ शुगर माळेवाडी दुमाला ता नेवासा जि. अहमदनगर येथे तोडणी कंत्राटदार, वाहतुक कंत्राटदार व शेतकरी मेळावा संपन्न झाला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून श्री. विजय (बापू) शिवतारे संस्थापक चेअरमन व महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की येत्या १ ऑक्टोबर २०२४ रोजी गळीत हंगाम चालू होणार चालू होणार असल्याची माहिती आपल्या भाषणातून दिली.
ते पुढे बोलताना म्हणाले की या कारखान्याचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांची ऊस तोडणी साठी उसाची होणारी आडवणूक सोडवली जाईल व शेतकऱ्यांना या कारखान्याच्या माध्यमातून योग्य तो न्याय दिला जाईल व योग्य तो भाव दिला जाईल असे आपल्या भाषणातून बोलताना विजय शिवतारे यांनी सांगितले.
तसेच यावेळी स्वामी समर्थ शुगर अॅण्ड अॅग्रो इं. ली कारखान्याच्या कार्यकारी संचालक डॉ. ममताताई शिवतारे-लांडे यांनी उपस्थितांना संबोधीत केले व आपले मनोगत मेळाव्यात व्यक्त केले.
तसेच यावेळी शेतकी मेळावा व तोड/वाहतुक प्रस्तावना श्री. राजेंद्र काळे साहेब (मुख्य शेतकी अधिकारी) यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कारखाण्याविषयी सर्व माहीती दिली.
तसेच कार्यक्र प्रसंगी मंचावरती गिडेगावचे नवनाथ साळुंके, गणेश लंघे, शिंदे आण्णा आदी मान्यवर तसेच ऊस उत्पादक शेतकरी कंत्राटदार तसेच वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन विजय बाप्पू शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आले