बाळासाहेब मुरकुटे यांच्या मागणीला यश मुळा धरणातून पाणी सुटले

बाळासाहेब मुरकुटे यांच्या मागणीला यश मुळा धरणातून पाणी सुटले
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटूनही नेवासा तालुक्यात भक्कम पाऊस न झाल्याने पाणी पातळी अद्याप पर्यंत वाढलेली नाही त्यामुळे पुढील रब्बी पिके धोक्यात येण्याची चिन्ह असल्याने शेतकऱ्यांना पाण्याची चिंता भेडसावत आहे धरणावर पाऊस चांगल्या प्रकारे झाल्यामुळे मुळा धरण ओव्हर फ्लो झाले आहेत नेवासा तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ओव्हर फ्लो चे पाणी नदीला न सोडता पाटाला सोडण्याची मागणी नेवासाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन केली आहे तसेच यावेळी जिल्हाधिकारी व इरिगेशन खात्याला या संदर्भात सूचना देण्यात आले आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या मागणीची दखल घेऊन आज दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी मुळा धरणातून आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दिली या पाण्यातून शेतकऱ्यांनी बंधारे साठवण तलाव तसेच आजूबाजूची खड्डे भरून घ्यावी असे आव्हान आमदार मुरकुटे यांनी केले आहे.