शेतकऱ्यांना आनंदाची बातमी रविवारी सायंकाळी सहा वाजता मुळाचे आवर्तन सोडले …. आमदार लंघे पाटील यांची माहिती….

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी रविवारी सायंकाळी सहा वाजता मुळाचे आवर्तन सोडले …. आमदार लंघे पाटील यांची माहिती….
नेवासा (प्रतिनिधी) –
नेवासा तालुक्याला वरदान ठरलेले मुळा धरणाचे आवर्तन रविवारी (दि.२७) रोजी सायंकाळी सहा वाजता सोडले असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
ते आमदार लंघे – पाटील बोलतांना म्हणाले की,आज सायंकाळी सहा वाजता मुळा धरणामधून शेतकऱ्यांसाठी पाट पाण्याचे आवर्तन सोडल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार लंघे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
पाटपाण्यासाठी शेतकऱ्यांची नेवासा तालुक्यामध्ये मागणी होत होती त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे – पाटील यांच्याकडे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पाटपाण्याच्या संदर्भात पाठपुरावा केलेला असल्यामुळे हे आवर्तन सोडण्यात आले आहे.
आमदार लंघे – पाटील यांच्या मागणीच्या धर्तीवर काही दिवसांपूर्वी नामदार राधाकृष्ण विखे – पाटील यांनी पाटबंधारे विभागाची बैठक बोलावून पाटपाण्याच्या संदर्भात नियोजन केलेले होते त्या बैठकीदरम्यान नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे हे या बैठकीला उपस्थित होते.नामदार राधाकृष्ण विखे – पाटील यांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांना आदेश दिले होते की,आमदार लंघे – पाटील म्हणतील त्याप्रमाणे पाटपाण्याचे नियोजन करा त्याच अनुषंगाने रविवारी सायंकाळी सहा वाजता मुळा धरणामधून आवर्तन सोडले असल्याची माहिती आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली या पाटपाण्यामुळे ऊस,बाजरी,मका, भुईमूग तसेच फळबागांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
..,……………………………………………………………….
जिल्ह्याचे पालकमंञी ना.राधाकृष्ण विखे – पाटील आणि नेवासा विधानसभेचे आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांची राजकीय गट्टी असल्यामुळे आमदारांची मागणी पालकमंञी विखे – पाटील यांच्या दरबारात क्षणार्धात पुर्ण होत असल्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवली गेली असल्याचे आता शेतकऱ्यांतून उघडपणे बोलले जात आहे.