सौंदाळा सरपंचांचे उपोषण ३रा दिवसानंतर ग्रामस्थ आक्रमक*

*सौंदाळा सरपंचांचे उपोषण ३रा दिवसानंतर ग्रामस्थ आक्रमक*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावचे सरपंच शरदराव आरगडे यांनी वडाळा ते सौंदाळा रस्ता तातडीने डांबरीकरणणाचे काम करण्यासाठी सौंदाळा ग्रामपंचायत कार्यालयातच उपोषण सुरु केले आहे
२०१९ मध्ये मंजूर असलेला वडाळा ते सौंदाळा रस्ता अद्याप झालेला नाही रांजणगाव हद्दीत काम अपूर्ण असून सौंदाळा हद्दीत दिड किमी रस्ता कामच सुरु केलेलं नाही
तब्बल ५ वर्ष काम सुरु ना करणाऱ्या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाने का केली नाही त्या ठेकेदारावर तातडीने कारवाई करून रस्त्याचे काम तातडीने सुरु केलेच पाहिजे
यासाठी सौंदाळा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच श्री शरदराव आरगडे यांनी ग्रामपंचायत मध्येच आमरण उपोषण सुरु केले आहे
या उपोषणास पाठिंबा म्हणून ग्रामस्थ धरणे आंदोलन करत आहेत रात्री उपोषण स्थळी भजनाचा कार्यक्रम करण्यात येतो
परंतु ३ दिवस होऊन देखील प्रशासनाने कुठलीच दखल ना घेतल्याने सोमवारी दि ७/१०/२०२४ रोजी ११ वा ग्रामपंचायत समोर सर्व ग्रामस्थ व महिला प्रशासनाच्या नावाने जागरण गोंधळ करणार असुन तरी देखील प्रश्न सुटला नाही तर आक्रमक भूमिका घेऊन मंगळवारी ११ वा नेवासा शेवगाव रस्त्यावर सौंदाळा बसस्टॅन्ड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिलेला आहे