स्वामी समर्थ शुगर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाची सांगता…

स्वामी समर्थ शुगर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाची सांगता…
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
भा स्वामी समर्थ शुगर अॅग्रो ई.ली. महालक्ष्मी नगर माळेवाडी दुमाला ता. नेवासा जि० अहिल्यानगर प्रथम गळीत हंगाम सांगता समारंभ शनिवारी संपन्न झाला.
या सांगता समारंभासाठी स्वामी समर्थ शुगर कारखान्याचे सर्वेसर्वा चेअरमन मा.विजयबापू विजयबापू शिवतारे, कार्यकारी संचालक सौ. ममताताई लांडे – शिवतारे उपस्थितीत संपन्न झाला.
सदर सांगता समारंभ कार्यक्रम कारखान्याचे मुख्य शेतकी आधिकारी नानासाहेब लंघे यांच्या हस्ते पुजन तसेच देवा ब्राह्मणांच्या साक्षीने संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रसंगी चिफ इंजिनीयर सोनवने साहेब, चिफ केमिष्ट ताकवणे साहेब, कदम साहेब, धावडे मामा, विशाल म्हस्के , तुपे साहेब, सत्तरकर साहेब, साबळे साहेब, गुंड साहेब, शिंदे साहेब, मुरकुटे साहेब , किशोर लंघे ,दुकळे साहेब, पोटे साहेब तसेच सर्व स्वामी समर्थ शुगर ऍग्रोचे कारखाना कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते.
हा कार्यक्रम कारखाना स्थळावरती माळीवाडी दुमला येथे संपन्न झाला.