सलाबतपुर- दिघी रोड परिसरातील नागरिक रोहित्र बिघडल्याने विजे अभावी नागरिक अंधारात
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा...
सलाबतपुर- दिघी रोड परिसरातील नागरिक
रोहित्र बिघडल्याने विजे अभावी नागरिक अंधारात….
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा…
नेवासा प्रतिनिधी – मंगेश निकम
नेवासा तालुक्यातील सलाबतपुर दिघी रोड लागत असलेल्या निकम वाघ वस्ती वीजपुरवठा करणारा सिंगल फेज रोहित्र आठ ते दहा दिवसापासून बिघडल्यामुळे या परिसरामध्ये कमी प्रमाणात डीम स्वरूपात लाईट सुरू आहे. वारंवार सलाबतपुर येथील महावितरणचे शाखा अधिकारी यांना फोनवर संपर्क करून माहिती देऊनही त्यांनी अद्याप आठ दिवसापासून कोणत्याही प्रकारचे पाऊल न उचल्यामुळे अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा व
हलगर्जीपणा या ठिकाणी दिसून येत आहे.
विजे अभावी नागरिक अंधारात असल्याने नागरिकांचा रोष वाढला आहे.
निष्क्रिय अधिकाऱ्यांची लवकरात लवकर बदली होऊन या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकारी यावेत ही अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
नियमित प्रमाणे वीज भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांना हा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे संबंधित अधिकाऱ्यांना फोन केल्यास उचलत नाहीत आणि उचलला तरीही उडवाउडवीची उत्तरे देत असल्याची तक्रार असल्याने कारवाई व्हावी अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे.
हे अधिकारी आपल्या कार्यालयीन ठिकाणी राहत नसून नाशिक येथून येत असतात तसेच आठवड्यातून एक ते दोन दिवसच महावितरणच्या सलबतपुर ऑफिसला येत असतात अशाप्रकारे जर प्रशासनाचा पगार घेऊन एक ते दोनच दिवस ड्युटी जर हे असे अधिकारी करत असतील तर हा प्रशासनाचा व महावितरणचा मोठा सावळा गोंधळ असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे .
अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यास तसेच विजेचा प्रश्न न सोडवल्यास येथील नागरिक आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत असा इशारा नागरिकांनी दिला आहे.