Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

अनकमांड दाखल्यासाठी धरणे आंदोलन – सरपंच शरदराव आरगडे

0 4 0 5 2 7

अनकमांड दाखल्यासाठी धरणे आंदोलन – सरपंच शरदराव आरगडे

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील शेतकऱ्यांना अनुकंमांचा दाखला मिळत नसल्याने कुकाणा येथील मुळा पाटबंधारेच्या शाखे समोर सौंदाळा ग्रामस्थांसह 23 सप्टेंबर रोजी ११ वा धरणे आंदोलन करणार असल्याचे लोकनियुक्त सरपंच शरदराव आरगडे यांनी सांगितले

सौंदाळा ग्रामपंचायतच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत २८ ग्रामस्थांनी सामूहिक विहीर घेण्यासाठी स्वतंत्र अनकमाड दाखल्याची मागणी मागील तीन महिन्यापूर्वी चिलेखनवाडी (कुकाणा) येथील मुळा पाटबंधारे शाखेकडे केली आहे

त्याचा वारंवार पाठपुरावा सरपंच शरदराव आरगडे यांनी केला आहे सदर दाखल्यासाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्र चिलेखनवाडी (कुकाणा) शाखेत जमा केले असूनही जाणीव पूर्वक शाखेतील कर्मचारी टाळाटाळ करत आहेत

सदरचा दाखला न मिळाल्यास लाभार्थी शेतकरी विहिरीचा लाभ मिळण्या पासून वंचित राहू शकतात याची पूर्वकल्पना कर्मचाऱ्यांना देऊनही दाखला देण्यास विलंब होत असल्याने सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता मुळा पाटबंधारे चिलेखनवाडी (कुकाना)शाखा यांना निवेदनाद्वारे कळविले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे