किड्स किंगडम विद्यालयाचा रक्षाबंधन निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम…
किड्स किंगडम विद्यालयाचा रक्षाबंधन निमित्ताने आगळा वेगळा उपक्रम…
कुकाणा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज शनिवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून येथील कुकाणा येथील किड्स किंगडम विद्यालयातील चिमुकल्या विद्यार्थिनींनी शाळेतील विद्यार्थ्यांसह प्रत्यक्ष कुकाणा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिस नाईक काळोखे ,पोलीस नाईक वाघमोडे,पोलीस कॉन्स्टेबल ढाकणे,पोलीस कॉन्स्टेबल फाटके,
पोलीस कॉन्स्टेबल धायतडक, पोलीस कॉन्स्टेबल म्हैसमाळ आदी पोलीस
कर्मचाऱ्यांना राख्या बांधून हा पवित्र सण साजरा केला. प्रसंगी पोलीस बांधवानी देखील ओवाळणी म्हणून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी घेत अडचणीच्या वेळेस तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन केले.
आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा – सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत त्यामुळे किड्स किंगडम विद्यालयाच्या प्रमुख कीर्ती बंग आपण हा उपक्रम राबवला असल्याचे म्हणले आहे. त्याच बरोबर वृक्ष संवर्धन ही काळाची गरज असल्याने शेळेच्या परिसरात वृक्षाना देखील राखी बांधून वेगळा संदेश या निमित्ताने दिला आहे.
या उपक्रमाने सर्वत्र या उपक्रमाचे स्वागत होत आहे
या उपक्रमात अनिता बडे प्रतिभा कदम,सोनाली जामदार,कोमल म्हस्के, पूजा पवार आदी शिक्षिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे.