पहलगाम हल्ल्याचा सोनईत कॅडल मार्चने निषेध. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्यासह शेकडो तरुणांनी एकत्र येऊन केला निषेध…

पहलगाम हल्ल्याचा सोनईत कॅडल मार्चने निषेध.
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्यासह शेकडो तरुणांनी एकत्र येऊन केला निषेध…..
नेवासा प्रतिनिधी –
सोनई ता नेवासा येथे सोनई, राहुरी
मार्गावरील
छत्रपती शिवाजी महाराज चौकात
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांच्या नेतृत्वाखाली सोनई येथे कँडल मार्च काढून हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला.
प्रस्ताविक बाबा अनारसे यांनी केले
याप्रसंगी बोलतांना
यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख म्हणाले
पहलगाम येथील निष्पाप भारतीयांवर झालेला हल्ला हा देशाच्या अस्मितेवर झालेला हल्ला आहे.
या हल्यामुळे
प्रत्येक भारतीयांना तीव्र वेदना झाल्या आहेत.
देशावर होणाऱ्या हल्ल्याचे
जशास तसा हल्ला करून उत्तर दिले पाहिजे
हा हल्ला प्रत्येक भारतीयांवर झालेला या भावनेने यावेळी देशाबरोबर सर्वांनी उभे राहावे.
धर्माच्या नावावर, सामान्य निर्दोष नागरिकांवर जो भ्याड आतंकवादी हल्ला करण्यात आला यामध्ये निष्पाप 26 भारतीयांना आपले प्राण गमवावे लागले. या अतिरेक्यांनी एकप्रकारे भारतीय अस्मितेवर न पेलणारा घाव घातला आहे. त्यामुळे जनसामान्य माणसांत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे व संपूर्ण भारतवासी वेगवेगळ्या पद्धतीने या हल्ल्याचा सोनई व परिसरातील मित्र, तरुण व ज्येष्ठ हे सर्व या भ्याड हल्ल्याचा कँडल मार्चने एकत्र येऊन आपण निषेध करत आहोत असे म्हणाले व उपस्थितांच्या वतीने
शहीद झालेल्या सर्व भारतीय नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली
याप्रसंगी प्रकाश शेटे,गणेश शिंदे,वैष्णवी वाकडे, अभिषेक बार्वेकर
आदींनी मनोगत व्यक्त केले
राष्ट्रगीताने
कँडल मार्चची सांगता करण्यात आली
सोनई पोलीस स्टेशनचे स पो नि
विजय माळी यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.