Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्यातील साखर कामगारांचे साखर आयुक्तांना साकडे…

*त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करून साखर कामगारांना 50 टक्के वेतनवाढ देण्याची मागणी*

0 4 0 5 2 5

 

त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करून राज्यातील साखर कामगारांना वेतनवाढ लागू करावी या मागणीचे निवेदन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना देतांना राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार,सुखदेव फुलारी आदी.

पुणे/प्रतिनिधी( दि.5 ऑगस्ट ) महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

राज्यातील साखर उद्योगातील कामगारांच्या कराराची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे. 01 एप्रिल पासून राज्यातील साखर उदयोगातील  कामगारांचे वेतनवाढ व सेवा शर्ती ठरविण्यासाठी तातडीने त्रिपक्ष समिती गठीत करून कामगारांना नवीन 50 टक्के वेतनवाढीचा लाभ मिळावा या मागणीचे साकडे  महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन (इंटक)ने आज सोमवारी (दि.5) राज्याचे साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना घातले आहे.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने  दि.5 ऑगस्ट 2024  रोजी वेतनवाढीसाठी
साखर आयुक्त डॉ.कुणाल खेमनार
यांना साखर कामगारांच्या मागण्यांबाबद निर्णय घेण्यासाठी शासन पातळीवर त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी,दि.31 मार्च 2024 च्या पगारावर राज्यातील साखर कामगारांना 50 टक्के वेतनवाढ मिळावी या आणि इतर मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे संपर्क प्रमुख सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे, संजय राऊत, आप्पासाहेब शिंदे, अण्णासाहेब गर्जे, बबनराव लवांडे, भाऊसाहेब राजळे, देविदास म्हस्के, संदीप बलफे, अशोक भराट, अशोक थिटे,काकासाहेब खोजे आदि यावेळी उपस्थित होते.

————-प्रतिक्रिया ———–

*सरचिटणीस नितीन पवार…*

पुणे येथील साखर आयुक्तालयात बोलतांना महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशनचे(इंटक) सरचिटणीस नितीन पवार म्हणाले की,त्रिपक्ष समिती गठीत करून साखर कामगारांना 50 वेतनवाढ मिळावी,वेतनवाढीचा अंतिम निर्णय होई पर्यंत 5 हजार रुपये हंगामी वेतनवाढ लागू करावी या व इतर मागण्यांची नोटीस साखर आयुक्त यांना देण्यात आली आहे.
येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात कधीही आचार संहिता लागू होऊ शकते.
निवडणूकीच्या धामधुमीतच साखर कारखान्यांचे गळीत हंगाम ही सुरू होणार आहेत . त्यामुळे राज्य शासनाने याबाबद लक्ष घालून तातडीने हा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.
*-नितीन पवार*
सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय साखर कामगार फेडरेशन

———————————————————————–

*राज्यातील साखर कामगारांच्या प्रमुख मागण्या*

– त्रिपक्ष समिती तातडीने गठीत करावी.
– राज्यातील साखर कामगारांना किमान 50 टक्के वेतनवाढ मिळावी
– नोकरीच्या कालावधीप्रमाणे अतिरिक्त, जादा पगारवाढ देणे.
– महागाई भत्ता प्रति पाइंटला 5 रुपये दराने द्यावा.
– वेटेज अलोन्समध्ये वाढ करावी
– वेतनवाढीचा अंतिम करार होई पर्यंत 5000 रुपये हंगामी वेतनवाढ मिळावी.
– रिटेन्शन अलौन्स अकुशल 40 टक्के,निमकुशलसाठी 50टक्के,कुशल अ,ब,अतिकुशल,क्लार्क 1,2,3,4 व सुपरवायझरी ए,बी,सी साठी 60 टक्के द्यावा.
-एकूण पगारावर घरभाडे 5 टक्के भत्ता मिळावा.
– रात्रपाळी भत्ता 50 रुपये करावा.
– दरमहा 400 रुपये धुलाई भत्ता मिळावा.
– दरमहा 600 रुपये वैद्यकीय भत्ता मिळावा.
– दरमहा 500 रुपये शिक्षण भत्ता मिळावा.
-एक महिन्याचे पूर्ण पगारा इतका लिव्हा ट्रँव्हल्स अलौन्स मिळावा.
-स्त्री कामगारांना शासकीय नियमाप्रमाणे बाळंतपणाची रजा मिळावी.
– कामगारांना हुद्देवारी व ग्रेड  मिळावी.
-दरवर्षी किमान 15 पगारी सुट्ट्या मिळाव्यात.
– कर्मचार्यांच्या मुलांना, वारसास कामावर घेणे.
– मयत, सेवानिवृत्त, राजीनामा दिलेल्या कर्मचार्यांना कराराचे फायदे मिळणे
– कायम कामगारांना वर्षाला 30 दिवस तर हंगामी,टेंपररी कामगारांना सिझनला 15 याप्रमाणे ग्रॅच्युयटीची रक्कम मिळावी.
-हक्काच्या रजेची संचय मर्यादा कालावधी 5 वर्षाची असावी.
——————

 

5/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे