Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

भेंडा येथील संत सावता महाराज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन संपन्न..

संत सावता महाराजांनी उचित कर्म करूनच भगवंताची प्राप्ती केली- :देवीदास महाराज म्हस्के*

0 4 0 5 3 3

भेंडा येथील संत सावता महाराज मंदिर बांधकामाचे भूमिपूजन संपन्न…

*संत सावता महाराजांनी उचित कर्म करूनच भगवंताची प्राप्ती केली-देवीदास महाराज म्हस्के*

नेवासा प्रतिनिधी :— महाराष्ट्र 7 न्यूज वृत्तसेवा

संतांच्या जीवनाकडे बघून आपल्याला मुख्य गोष्ट ही शिकायची आहे की जे जे कर्म आपल्याला प्राप्त झालेले आहे ते कर्म उचित रीतीने, निष्काम व शुद्ध अंत:करणाने जर आपण केले तर आपल्याला वेगळी अशी भक्ती आणि उपासना करण्याची गरज पडणार नाही. सावता महाराजांना वेगळी उपासना, ध्यान, तीर्थयात्रा करण्याची काहीच गरज पडली नाही. लोकांना देवाकडे जावं लागतं. पण देव त्यांच्याकडे आले, कारण त्यांनी कर्म त्यागलं नाही. संत शिरोमणी सावता महाराजांनी उचित कर्म करूनच भगवंताची प्राप्ती केल्याचे प्रतिपादन नेवासा येथील श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडा येथे भेंडा-जेऊर रोडवरील फुलारी वस्तीवर २१ लाख रुपये ख़र्चन बांधण्यात येणाऱ्या श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर बांधकामाचे भूमीपुजन वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के व संत शिरोमणी सावता महाराज यांचे १६ वे वंशज रमेश महाराज वसेकर यांचे यांचे शुभहस्ते झाले. त्यावेळी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना म्हस्के महाराज बोलत होते.नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

अंकुश महाराज कादे,नवनाथ महाराज मुंगसे,ज्ञानेश्वर महाराज हजारे,गणेश महाराज चौधरी, दिगंबर महराज चौधरी,
माजी आ. बाळासाहेब मुरकुटे,काशिनाथ नवले पाटील,नागेबाबा उद्योग समुहाचे अध्यक्ष कडुभाऊ काळे, तुकाराम मिसाळ,दत्तात्रय काळे,अशोकराव मिसाळ,डॉ.शिवाजी शिंदे,नामदेवराव निकम,गणेशराव गव्हाणे, नामदेव शिंदे, शिवाजीराव तागड,अड. रविंद्र गव्हाणे, अशोकराव वायकर,बाबासाहेब भागवत,उद्योजक बापुसाहेब नजन,सुनील देशमुख, भाऊसाहेब फुलारी, दिलिप गोर्डे,जगन्नाथ साबळे,दादासाहेब गजरे,सोमनाथ कचरे, यडूभाऊ सोनवणे,संजय मिसाळ,नागेश नवले,बंड़ू गायकवाड आदि व्यासपीठावर उपस्थित होते.

*वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के पुढे म्हणाले की,* मंदिर उभ करायचं,उभ करणार आहोत,आणि केलं पाहिजे.पण मंदिर कशासाठी करायचं ही महत्त्वाची गोष्ट आहे. मंदिरे ही आपली प्रेरणास्थाने आहेत, बलस्थाने आहेत, ऊर्जा केंद्र आहेत. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्रेरणा मिळावी, ज्ञान मिळावं, शांती-समाधान याचा अनुभव यावा. जीवन जगण्याचं ज्ञान किंवा कला ज्याला म्हणा ती आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी मंदिरे हवीत.संत सावता महाराज यांनी निष्ठेने कर्म केलं, ते सोडून ते कुठे गेले नाही.तर उलट देवाला पंढरपूर सोडून तिथे यावं लागेल. यातून आपण काय शिकायचं तर आपल्या वाटयाला आलेले कर्म आपण निष्ठेन आणि भगवंता अर्पण बुद्धीनं करायचं. हे त्या मंदिरामध्ये येऊन आपण शिकायचं. मंदिर ही ऊर्जा केंद्र आहेत, तिथून आपल्याला ऊर्जा मिळते, बळ मिळतं, जीवन जगण्याची दिशा मिळते आणि तशा रीतीचे मंदिर असली पाहिजेत हाच मंदिर निर्माणाच्या पाठीमागचा एकमेव हेतू असला पाहिजे.शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराजांचा, गुरुवर्य मीराबाईंचा देखील भेंडा गावाशी नेहमी संबंध राहिलेला आहे. म्हणून तुम्ही सर्वजन पुण्यवान असलेली सर्व मंडळी आहेत आणि तुमच्या सर्वांच्या पुण्याईच्या उदयास तुमच्या मनामध्ये ही भावना निर्माण झाली की संत शिरोमणी सावता महाराजांचे मंदिर या ठिकाणी असावं आणि तुम्ही त्या भावनेला मूर्तरूप दिलं, सुंदर असं मंदिर या ठिकाणी उभा राहणार आहे.

*श्रीक्षेत्र अरणचे रमेश महाराज वसेकर म्हणाले की,* संत शिरोमणी सावता महाराजांचा आशीर्वाद मी तुम्हा सर्वांना देण्यासाठी आज मी आलो आहे.
मंदिरासाठी ज्यांनी ज्यांनी जागा दान केली त्या सर्वांच्या परिवारात सुख शांती समाधानी राहो अशी मी संत सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो.
जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्ञानीयांचा राजा ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज असतील या सर्व संतांनी महाराष्ट्राला विचार दिले त्यात आमचे कर्मवीर संत शिरोमणी सावता महाराज
यांनी कर्मात भक्ती केली आणि पंढरीच्या राजाला आपलंसं केलं. सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी भव्य असे मंदिर उभे राहील अशी संत सावता महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो.

*आ.विठ्ठलराव लंघे म्हणाले,* खरंतर थोर संत महंतांच्या,लाडक्या बहिणीच्या आणि सर्व तरुणांनी-ज्येष्ठांनी जे आशीर्वाद दिले त्या आशीर्वादाने माझ्यासारख्या एक छोटासा कार्यकर्ता आमदार झालेला आहे.संत सावता महाराजांच्या मंदिराचे भूमिपूजन आज या ठिकाणी होत आहे.थोर संत-महंतांचे आशीर्वाद असले की सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात आणि आपला नेवासा तालुका ही थोर संत-महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे.अनेक चांगले मठ-मंदिरे आपल्या तालुक्यामध्ये आहे.राजसत्ता आणि धर्मसत्ता हे दोन्ही चाके जर बरोबर चालले तर प्रगती होत असते आणि निश्चित जोपर्यंत मी या तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे तोपर्यंत धर्मासत्तेला बरोबर घेऊन जाण्याची माझी प्रामाणिक तळमळ राहणार आहे.
माजी पालकमंत्री राधकृष्ण विखे पाटील यांनी संत ज्ञानेश्वर मंदिराचा विकास आराखडा मांडलेला आहे आणि मी ज्यावेळेस सभागृहात जाईल, वेगवेगळ्या अधिवेशनाला जाईल त्यावेळी पहिले हा विकास आराखडा मंजूर करून त्याला निधी कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करील. या संत सावता महाराज मंदिर बांधकामाकरिता ही सर्वोतोपरी सहकार्य करू.
आजी आ.बाळासाहेब मुरकुटे, काशीनाथ नवले पाटील,नामदेवराव निकम यांनी ही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास आत्माराम लोंढे, पंढरीनाथ फुलारी,अजित रसाळ, डॉ.रावसाहेब फुलारी,आबासाहेब काळे,भाऊसाहेब फुलारी,राजेंद्र चिंधे, देवराव खराडे, शिवाजी फुलारी, रामकिसन फुलारी, ज्ञानदेव पुंड,डॉ. रजनीकांत पुंड,डॉ. लहानू मिसाळ, देवेंद्र काळे, तुळशीराम फुलारी, डॉ.संतोष फुलारी,सकाहरी सोनवणे, राजेंद्र फुलारी, प्रदीप फुलारी, संदीप जावळे,राजू जावळे,सतीश खराडे,नयन फुलारी,गोकुळ काळे,नवनाथ फुलारी,सचिन फुलारी,संभाजी सोनवणे,बाळासाहेब क्षीरसागर,लक्ष्मण फुलारी, संजय फुलारी,सोपान फुलारी आदि उपस्थित होते.

संतश्री सावता महाराज मंदिरा करिता जागा दान करणारे दादाराम फुलारी,अंबादास फुलारी, बाळासाहेब फुलारी,अर्जुन फुलारी यांचा महंतांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
प्रदीप काटे यांनी पौराहित्य केले.

संदीप फुलारी यांनी स्वागत-प्रस्ताविक केले.गणेश महाराज चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. सुखदेव फुलारी यांनी आभार मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे