नेवासा तालुक्याचे जावई रोहित खरे यांची लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती
नेवासा तालुक्याचे जावई रोहित खरे यांची लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती
भेंडा – ( प्रतिनिधी )
नेवासा तालुक्यातील शिरसगाव येथील आमदार विठ्ठलराव लंघे पाटिल यांचे बंधू प्रगतशिल शेतकरी सुनिल राव वकिलराव लंघे पाटिल यांचे कन्नड तालुक्यातील जावई रोहित खरे पाटिल यांची
नुकतीच भारतिय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल पदी पदोन्नती झाली आहे .
सुनिलराव लंघे पाटिल हे उच्च शिक्षित असून त्यांनी आपल्या शेतीत नेहमी वेगवेगळे प्रयोग करून समाजाला दिशा दर्शक काम केले आहे . त्यांनी प्रापंचिक जिवणात एकाच मूलीवर थांबवून समाजामध्ये मुलगा – आणि मूलगी असा कोणताही भेदभाव बाळगू नका असा संदेश दिला आहे .
त्यांचीच एकूलती एक मूलगी ऐश्वर्या सुनिल राव लंघे पाटिल हिचा विवाह काही दिवसांपूर्वी कन्नड तालुक्यातील भोकनगाव या छोट्याशा खेड्यातील शेतकरी कुटुंबातील पुत्र रोहित रमेश खरे यांच्याशी झाला आहे . भारतीय सैन्यातील तोफखाना विभागातील रोहित खरे यांनी कर्नल पदावर बढ़ती मिळवून कन्नड तालुक्याचा नावलौकिक वाढवला आहे त्यांचे बढती बद्दल विरोधी पक्षनेते – अंबादास दानवे, खा . संदिपान भुमरे, आमदार – विठ्ठलराव लंघे पाटिल, आ संजना जाधव, गणपतराव खरे, सुनिलराव लंघे, आ . उदयसिंग राजपूत ,आ नामदेव पवार , ऐश्वर्या खरे यांनी अभिनंदन केले आहे .




