*बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स कृषी महाविद्यालय, भानसहिवरेच्या कृषी दूतांची वारकऱ्यांसाठी सेवाभावी धाव*
*पिण्याचे पाणी, अल्पोपहार व आवश्यक मदतीतून जपली सामाजिक बांधिलकी*

*बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स कृषी महाविद्यालय, भानसहिवरेच्या कृषी दूतांची वारकऱ्यांसाठी सेवाभावी धाव*
*पिण्याचे पाणी, अल्पोपहार व आवश्यक मदतीतून जपली सामाजिक बांधिलकी*
कुकाणा (वार्ताहर) : -महाराष्ट्र 7न्यूज वृतसेवा
आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे पायी प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी बेल्हेकर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या कृषी महाविद्यालय, भानसहिवरे येथील कृषी दूतांनी सेवाभावाची प्रेरणादायी परंपरा जपली. कृषी दूत पंकज बर्डे, ओंकार भाकरे, ऋषिकेश भांगे, प्रनोत नवले व युवराज राजपूत यांनी अत्यंत उत्साहाने वारकऱ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी, अल्पोपहार तसेच आवश्यक ती मदत उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले.
महाविद्यालयातील प्राध्यापक, स्थानिक ग्रामस्थ तसेच कृषी सहाय्यक कांचन गरड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची आत्मीयतेने विचारपूस करत त्यांच्या प्रवासातील गरजा जाणून घेत मदतीचा हात दिला. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
दीर्घ पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या या सेवाकार्याचे मनापासून कौतुक करत त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. समाजसेवेची भावना, मानवतेचा संदेश आणि वारकरी परंपरेप्रती असलेला आदर यांचा सुंदर संगम या उपक्रमातून पाहायला मिळाला.
शैक्षणिक ज्ञानाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम विशेष यशस्वी ठरला.



