Breaking
ई-पेपर

सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून सलाबतपुरला मी नेहमी पाहत आलेलो आहे.-आ. विठ्ठलराव लंघे

सलाबतपूर येथे समस्त ग्रामस्थांचे वतीने आमदार विठ्ठलराव लंघेंचा नागरी सत्कार संपन्न..

0 6 0 5 0 7

सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून सलाबतपुरला मी नेहमी पाहत आलेलो आहे..- आ. विठ्ठराव लंघे.

 

सलाबतपूर येथे समस्त ग्रामस्थांचे वतीने आमदार विठ्ठलराव लंघेंचा नागरी सत्कार संपन्न……

नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथे आज नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता .

या प्रसंगी आमदार लंघे बोलताना म्हणाले की सलाबतपुर हे गाव मला कुटुंबासारखे आहे नेहमी या गावाची नाळ माझ्यासोबत जोडली गेलेली आहे.

सलाबतपुर मध्ये सर्व जाती-धर्माचे मंडळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका विचाराने काम करतात खडतर प्रवासामध्ये ही सलाबतपुर गावाने मला नेहमी झुकते माप दिले
1995 -96 सालामध्ये माझ्या गावाचे मतदान या गटामध्ये नव्हते तरीही या गटाने मला भरभरून प्रेम दिले 1995 ते 2004 मला जनतेने सातत्याने प्रवाहात ठेवली त्यामध्ये सलाबतपुर चा मोठा मोलाचा वाटा आहे.

राजकारणामध्ये माझ्याकडे सत्ता नव्हती पैसा नव्हता तरीही जनतेने मला स्नेहा पोटी व प्रेमापोटी समाजकारण व राजकारणामध्ये टिकून ठेवले यातच मोठी माझी भाग्य आहे आणि त्यामध्ये सलाबतपुरचा मोठा मोलाचा वाटा आहे.

एवढ्या मोठ्या ताकतीच्या विरोधकांसमोर जनतेने जिवंत ठेवले यामध्ये जनतेचे मोठे उपकार माझ्यावरती आहेत तसेच थोर संत महंतांनाचे आपल्याला आशीर्वाद या विजयामध्ये लाभले सर्वात महत्त्वाचे माझ्या विजयामध्ये लाडक्या बहिणीचे योगदान मध्ये आहे असे आमदार लंघे बोलताना म्हणाले.

आजच्या मिरवणुकीमध्ये येत असताना ट्रेलर मधून शेतातून जाणाऱ्या लाडक्या बहिणीने मला थांबवून व सलाबतपुर गावचा पिण्याचा पाण्याचा मोठा प्रश्न आमचा मार्गी लावण्याचे त्यांनी मला विनंती केली परंतु पहिल्याच अधिवेशनामध्ये मी सलाबतपुर पाणी योजनेचा उल्लेख करून मागणी केली आहे. आणि त्या मागणीला मी नेहमीच पूर्णत्वास नेणार असे बोलताना आमदार लंघे म्हणाले.

आमदार लंघे पुढे बोलताना म्हणाले की प्रामाणिकपणाने तसेच नियत साप ठेऊन कुठलीही काम केले तरी ईश्वर साथ देतो असे मानणारा मी एक कार्यकर्ता आहे आणि त्या प्रामाणिकपणाला मला 2024 मध्ये यश मिळाले आणि त्या यशामध्ये सलाबतपुरचा मोठा वाटा आहे सलाबतपुर मध्ये पाणी प्रश्न मोठा असून तो मी भविष्य काळामध्ये मार्गी लावणार असल्याचे आमदार लंघे सांगितले त्यांनी या प्रसंगी अशपाक भाई मित्रमंडळाचे व समस्त ग्रामस्थ सलाबतपुर यांचे आभार व्यक्त केले.

या नागरी सत्कार प्रसंगी सलाबतपुर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक दाने हे होते तर मंचावरती नेवासा तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार विठ्ठलराव लंघे, सरपंच नवनाथ शिंदे, गोरे सर, पेहरे साहेब औताडे महाराज, बाळासाहेब निकम ,कर्डक सर, बबनराव तांबे ,सुनील नजन, एकनाथ मामा दळवी, राजेंद्र विधाटे, रामदास निकम, जब्बार टेलर, दत्तात्रेय नांगरे, अश्फपाक भाई शेख ,रफिक भाई, सुनील नजन, कैलास कपिले, कैलास निकम, गणेश कुऱ्हाडे , राजेंद्र साळुंके, तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी गावडे सर यांनी केले तसेच यावेळी समस्त ग्रामस्थ सलाबतपुर व युवक वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे