शिक्षण सप्ताह अंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस संपन्न..
शिक्षण सप्ताह अंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस संपन्न..
शेवगाव प्रतिनिधी :- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
शिक्षणाबद्दल जागृती व महत्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षा सप्ताह हा कार्यक्रम या वर्षी जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळी ता.शेवगाव याथे साजरा करण्यात आला आहे. देशाच्या सर्वांगीण विकासात कौशल्य शिक्षणाची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी या आठवड्यात एक दिवस कौशल्य शिक्षणाबाबत विविध उपक्रमाचे आयोजन दिनांक २२ जुलै २०२४ ला ‘ कौशल्य व डीजीटल उपक्रम दिवस ‘ जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळी ता.शेवगाव मध्ये करण्यात आले होते
दिवसाची सुरवात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांच्या परिपाठाने झाली. या प्रसंगी व्यासपीठावर शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे जेष्ठ शिक्षक नानासाहेब काटे व कौशल्य दिनाचे प्रमुख संयोजक रावसाहेब घनवट, सुधाकर उगले उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रकाश उगलमुगले यांनी प्रास्ताविकातून कौशल्य दिनाच्या आयोजनाचे औचित्य विशद करतांना यासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यवसायाची ओळख करून घेऊन भविष्यात त्याविषयी अधिक माहिती मिळवण्या प्रवृत्त करणे हाच नवीन शैक्षणिक धोरणाचा उद्देश आहे असे सांगितले. इयत्ता १० वी ची विद्यार्थिनी कु. प्रणाली साबळे हिने इंग्रजीतून डिजिटल तंत्रज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच याप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बाळासाहेब मोटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून नविन शैक्षणिक धोरणामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे महत्व विषद करुन हा शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी लोकनेते श्री.मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आ.डाॅ. नरेंद्रजी घुले,मा.आज.चंद्रशेखर घुले पाटील, मा.जि. प.अध्यक्ष राजश्रीताई घुले पाटील, पंचायत समितीचे सभापती युवकपेते क्षितिजभैय्या घुले पाटील यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना अध्ययनात तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा शिक्षणासोबतच व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे अहवान केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया मुळे तर आभार प्रदर्शन अमोल लोखंडे यांनी केले .
दुपारच्या सत्रात वर्गश: परिसरातील विविध व्यवसायिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या व्यवसायाविषयी विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली यात प्रामुख्याने लोह वस्तू भांडार , फुलांची शेती, शिलाई मशीन केंद्र, बागायती शेती यांचा समावेश होता यासाठी गावातील सरपंच, चेअरमन,शाळा व्यवस्थापन समिती व त्यांच्या सहकाऱ्यांचे मोलाचे योगदान मार्गदर्शन लाभले.व सर्व शिक्षक, कर्मचारी बंधू भगिनीं विद्यार्थीनी विद्यार्थी यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे उत्साहात संपन्न झाला यावेळी जनसमुदायांच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले यावेळी आबासाहेब वाघमारे,ज्योती काळे, बाळासाहेब उगले,जगदीश आरेकर, अशोक खंडागळे, रघुनाथ पटारे यांनी सहकार्य केले