कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती विविध उपक्रमाणे साजरी.

कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती विविध उपक्रमाणे साजरी.
कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
कुकाण्यात किड्स किंग्डम अकॅडमित क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने विविध उपक्रम घेण्यात आले, क्रांतिजोती
सावित्रीबाई जोतीराव फुले ३ जानेवारी, इ.स. १८३१ – १० मार्च, इ.स. १८९७ या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या.भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना ओळखले जाते. आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाईंना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते. सावित्रीबाई आणि त्यांचे पती हे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.या दोघांनी १ जानेवारी, १८४८ रोजी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची शाळा सुरू केली.
आज समाजात पुरुष प्रधान संस्कृती असेलेल्या आपल्या देशात स्रियांना सावित्रीबाई फुले यांच्या मुळे शिक्षण मिळाले या निमित्ताने किड्स किंगडम
अकॅडमित चिमुकल्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यात डॉक्टर, इंजिनियर, पायलट, शिक्षिका,आदि वेशभूषा करून जयंती निमित्ताने भाषणे केले, या उपक्रमासाठी
शिक्षिका अनिता बडे प्रतिभा कदम,रोहिणी सरोदे , पूजा पवार,वैष्णवी कदम आदीनी परिश्रम घेतले.