पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
फुले यांची जयंती साजरी स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाला दिशा देणारे- मनोजआण्णा पारखे

पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी
स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य समाजाला दिशा देणारे-मनोजआण्णा पारखे
नेवासा(प्रतिनिधी)-
नेवासा येथे पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने विविध ठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १८६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्त्री शक्तीच्या उद्धारासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे मोठे कार्य असून समाजाला दिशा देणारे आहे त्यांच्या कार्यातून महिला भगिनींनी प्रेरणा घ्यावी व त्यांच्या स्त्री शिक्षणाच्या चळवळीला गती द्यावी असे आवाहन भाजपचे युवा नेते व पसायदान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोजआण्णा पारखे यांनी यावेळी बोलतांना केले.
नेवासा शहर प्रभागातील दारुंटे मळा येथे सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर नगरपंचायत चौक,श्री खोलेश्वर गणपती चौक,
भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे ही भाजपचे युवा नेते
मनोजआण्णा पारखे यांच्या पुढाकाराने सर्व समाज बांधवांना एकत्रित करून सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलतांना मनोजआण्णा पारखे म्हणाले की राष्ट्र पुरुषांचे कार्य भावी पिढीला कळावे म्हणून पसायदान प्रतिष्ठानच्या वतीने सर्व समाजाला एकत्रित करून त्यांचे जीवन कार्य जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे,सावित्रीबाई फुले यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असून महिलांनी देखील त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या जयंती कार्यक्रम प्रसंगी श्रीपतराव दारुंटे,प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष सुधीर चव्हाण,भाजपचे शहर उपाध्यक्ष राजेश कडू,अजित नरुला,शिक्षक संदीप जंगले,शिक्षिका सुवर्णा भांड,अंगणवाडी सेविका कावेरी दारुंटे,अजित नरुला, योगेश दांडाईत,गोरक्षनाथ बेहळे,डॉ. कुमार दारुंटे, चंद्रकांत उकीरडे,राजेंद्र दारुंटे,शरद दारुंटे, निलेश दारुंटे, महेश दारुंटे, किरण दारुंटे,संदीप बेळे,उमेश बनकर सचिन दारुंटे,ऋषिकेश दारुंटे,शिवाजी लष्करे, श्रीराम लष्करे,ऋषिकेश उपळकर आदीसह विद्यार्थी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.