देवगड देवस्थानचे मुख्य चोपदार बाळासाहेब कानडे त्यांच्या मातोश्री श्रीमती जनाबाई कानडे पाटील यांचे निधन…..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील बकुपिंपळगाव येथील जुन्या पिढीतील श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या सेवेकरी श्रीमती गं. भा. जनाबाई साहेबराव कानडे पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८७ वर्षे होते. स्वर्गीय जनाबाई कानडे पाटील यांच्या पच्यात चार मुले, एक मुलगी, सूना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. देवगड संस्थानचे मुख्य चोपदार बाळूमामा महाराज कानडे, पोलीस पाटील बाबासाहेब कानडे, अण्णासाहेब कानडे, काकासाहेब कानडे, सौ. सिंधूताई नलावडे यांच्या त्या मातोश्री होत्या. बकुपिंपळगाव येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबा भक्त मंडळाच्या वतीने हभप दिनकरजी महाराज मते, डॉ. अशोकराव ढगे, पत्रकार सुधीर चव्हाण यांनी श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कार समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.