आमदार लंघेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्ता कामासाठी निधीची मागणी….

आमदार लंघेंची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या रस्ता कामासाठी निधीची मागणी….
नेवासा –
नेवासा तालुक्यातील धार्मिक तिर्थक्षेत्रांना जोडण्यासाठी रस्त्यांच्या कामांना निधी द्या, अशी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केली असून याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना प्रवरानगर येथील कार्यक्रमात निवेदन दिले.
निवेदनात म्हटले की, नेवासा नगरीशी भाविकांना जोडण्यासाठी केंद्रिय मार्ग निधी योजनेतंर्गत रस्त्यांच्या
कामासाठी निधी उपलब्ध करुन द्यावा. मराठी भाषेचे उगमस्थान असणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर मंदिर आणि जगविख्यात श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर सह देवगड तसेच वरखेड येथील महालक्ष्मी देवस्थानचा
कायापालट करण्यासाठी या धार्मिक तिर्थक्षेत्र असलेल्या पुण्यभूमीला जोडण्यासाठी रस्ता कामासाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात यावा.
नेवासा धार्मिक नगरीला देशाच्या नकाशावर जोडण्यासाठी विशेष लक्ष घालण्याची मागणी केली. संत ज्ञानेश्वर मंदिर, शनिशिंगणापूर, श्रीक्षेत्र देवगड देवस्थान आणि वरखेड येथील महालक्ष्मी मंदिर येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत असतात. या
- तिर्थक्षेत्रांच्या रस्त्यांची दुर्दशा झालेली असून दळणवळणाच्यादृष्टीने भाविकांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्यांना केंद्रीय मार्ग निधी योजने अंतर्गत मंजुरी देवून निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणीही ना. गडकरी यांच्याकडे आमदार लंघे यांनी केली.