परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कड़क उन्हाळा, लग्नसराई आणि सुट्ट्यातील पर्यटनाच्या पार्श्वभूमिवर नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिविक्षाधिन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांनी सुरक्षिततेच्या दृष्टिने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
नेवासा – अहिल्यानगर
नेवासा पोलीस ठाण्यामार्फ़त सांगण्यात आले आहे की,
* सध्या उन्हाळ्याचे दिवस असून सर्व सामान्य नागरिक हे घराबाहेर झोपत असतात त्यामुळे सदर संधीचा फायदा घेऊन चोरटे हे रात्री घरफोडी करू शकतात. सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. तसेच सर्व नागरिकांनी आपले मौल्यवान दागिने व पैसे सुरक्षित ठिकाणी ठेवावे.
* नागरिकांनी आपले सोने दागिने पैसे सुरक्षित बँकेत ठेवावे जास्त रक्कम घरामध्ये ठेवू नये, घर सोडून जाताना शेजारी यांना सांगावे.
* मुलांच्या परीक्षा झाल्यानंतर शाळेला सुट्ट्यात लागल्यानंतर बहुतांशी नागरिक बाहेरगावी फिरायला जात असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये सोने दागिने ल घरात ठेवू नये, बाहेरगावी जाणार असेल तर एखाद्या व्यक्ती घरामध्ये असावा. तसेच बाहेरगावी फिरायला गेल्यानंतर मोबाईल ला स्टेटस ठेवून आपण घरात मध्ये नाही याची खबरच जणू इतरांना देतो त्यामुळे स्टेटस ठेवताना या गोष्टीचा विचार केला जावा. सर्व मौल्यवान वस्तू बँकेत ठेवणे.
सध्या लग्नसराईचे दिवस असल्याने त्या संधीचा फायदा चोरटे घेऊ शकतात. विशेषत मंगल कार्यालय मध्ये लहान मुले नवरीचे दागिने चोरी करण्याचे खुप प्रकार घडले आहेत. लग्न कार्यात मंगल कार्यालयात शक्यतो नवरीचे दागिने जवळच्या नातेवाईकांच्या गळ्यात घालण्यासाठी द्यावे पिशवी मध्ये दागिने घेऊन फिरू नये.
* सर्व नागरिकांनी जागरूकता ठेवून आपल्या परिसरात काही संशयित इसम तोंडाला बांधून फिरत असताना मिळून आल्यास व सौंशयित मोटर सायकल दिसून आल्यास त्यांची चौकशी करून लागलीच पोलीस स्टेशनला कळवावे. चोरी करणारे शक्यतो ट्रिपल शीट असतात. आपले अस्तित्व लपवत असतात.
* आपल्या घराचे कडी – कोयंडे व्यवस्थित व मजबूत बसवून घ्यावेत. सर्व मुख्य दरवाजे लोखंडी ग्रील चे बसवून घ्यावे. शेतात राहणारे सर्व नागरिकांनी आपल्या घराला अलार्म सिस्टीम बसून घ्यावी.
नेवासा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व दुकानदार आस्थापना, पेट्रोल पंम्प, हॉटेल, इतर दुकानें यांना नेवासा पोलीस स्टेशन कडून सूचना आहे की त्यांनी आपल्या दुकानाच्या बाहेर कंपल्सरी CCTV CAMARE रोडच्या दिशेने स्वतःसाठी बसवावा जेणे करून पोलिसांना ही त्याचा तपासामध्ये उपयोग होईल. रात्रीच्या जाणारे व येणारे वाहन दिसेल अशा प्रकारचे चांगले कॅमेरे बसवावे. कॅमेरे वर धूळ बसणार नाही हे पाहणे. त्यातील वेळ बरोबर आहे कां ते पाहणे. तसेच त्याची दिशा बरोबर आहे कां हे वेळोवेळी पाहणे.
* अनोळखी मोबाईल वरून येणारे फोन व सायबर क्रिमिनल पासून सावध राहावे आपला OTP देऊ नये आपल्याशी फ्रॉड झाल्यास तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाइन वरती संपर्क साधावा.
कोणतीही बँक कोणत्याही कामासाठी आपल्याला फोन करत नाही. कोणत्याही आज्ञात व्यक्तीला पैसे पाठवताना खात्री करून घ्या.
आपण एक जागृत नागरिक आहात. आपली सेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे. आपण वरील सूचनांचे तंतोतंत पालन कराल ही अपेक्षा आहे असे श्री. खाडे यांनी नागरिकांना उद्देशून म्हटले आहे.