यात्रा उत्सवात प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वरखेड ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान…..

यात्रा उत्सवात प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट सेवा देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा वरखेड ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान…..
नेवासा –
महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या नेवासा तालुक्यातील वरखेड येथील श्री महालक्ष्मीदेवीचा यात्रोत्सव शांततेत पार पडला. यात्रा सोहळा यशस्वी होण्यासाठी योगदान देणाऱ्याऱ्यांचा तसेच विविध संस्था व विविध खात्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा वरखेड ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच विनोद ढोकणे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला .
नेवासा तालुक्यातील वरखेड देवी लक्ष्मी आईचा यात्रा उत्सव महाराष्ट्रात प्रसिद्ध असून या यात्रा उत्सवासाठी राज्यभरातून भाविक भक्त लाखोंच्या संख्येने येत असतात .
त्याच पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेत चौकाचौकात उत्कृष्ट चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. व कोणताही अनुचित प्रकार यात्रा उत्सवामध्ये न घडल्यामुळे व यात्रा उत्सव शांततेमध्ये पार पाडल्या मुळे वरखेड ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
याबद्दल पोलीस दलाचा मोठा मोलाचा वाटा असन त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त वरखेड ग्रामपंचायत च्या वतीने पोलीस अधिकारी संतोष खाडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांचा ग्रामपंचायतच्या वतीने सन्मान करण्यात आला.
त्यावेळी भाविकांना प्रशासनाच्या वतीने विविध सुविधा प्राप्त होण्यासाठी तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली होती व्याबद्दल ही त्यांचा सन्मान करून आभार मानण्यात आले.
देवीच्या दर्शनासाठी दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या काळजीचा भाग म्हणून नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य सेवा केंद्राची उभारणी करून भाविकांना मोफत औषधोपचार करणाऱ्या डॉक्टर नर्स व आरोग्य कर्मचारी यांना धन्यवाद देत त्यांचेच आभार यावेळी व्यक्त करण्यात आले.
तसेच भाविकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शिंगणापूर देवस्थानच्या वतीने पाणी टैंकर उपलब्ध करून देण्यात आले होते. स्खस्खत्या उन्हामध्ये दूरवरून आलेल्या भाविकांना नैवैद्य बनविण्यासाठी येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आपली शेतजमीनची जागा उपलब्ध करून पाण्याची ही व्यवस्था केली होती त्याबद्दल त्यांचाही यावेळी आभार मानण्यात आले .
या प्रसंगी सरपंच विनोद ढोकणे, उपसरपंच विलास जंदरे, श्रीरंग हारदे, पुरुषोत्तम हास्दे, अशोकराव सर्जे, भास्कर खरे, राजू आगळे, कडूभाऊ गोरे, लक्षाधीश दाणे, पोलीस पाटील संतोष घुगाशे, चंद्रकांत उंदरे व ग्रामपंचायत सदस्य दत्ता हारदे, शरद गणगे, तलाठी गीते, कर्जुले ग्रामसेवक अण्णासाहेब डेंगळे व आरोग्य अधिकारी उपस्थित होते
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान यात्रा उत्सव दिवसेंदिवस वृद्धिंगत होण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका सर्व खात्याने व या भागातील ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी यापुढेही अशीच ठेवावी असे आवाहन यावेळी सरपंच विनोद ढाकणे व समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.