सिने कलाकार चंद्रशेखर कडू पाटील यांचे निधन

सिने कलाकार चंद्रशेखर कडू पाटील यांचे निधन
नेवासा(प्रतिनिधी)-
नेवासाफाटा येथील रहिवासी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे कर्मचारी,काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागाचे राज्य उपाध्यक्ष सिने कलाकार चंद्रशेखर लक्ष्मण कडू पाटील यांचे अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ५४ वर्षे होते.
कै.चंद्रशेखर कडू पाटील यांच्या पच्यात आई,वडील, पत्नी,दोन मुले, बहीण,भाऊ असा परिवार आहे.भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण कडू पाटील यांचे ते चिरंजीव तर श्रीरामपूर येथील समाज सेविका अनिताताई भोसले यांचे ते बंधू होते.नेवासाफाटा येथे झालेल्या अंत्यसंस्कार प्रसंगी कॉ.बाबा आरगडे,कॉ. आप्पासाहेब वाबळे,पत्रकार सुधीर चव्हाण,होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे, वृद्धाश्रम चालक रावसाहेब मगर यांनी श्रद्धांजली वाहिली.
अंत्यसंस्कार समयी मोठा जनसमुदाय उपस्थित होते.
गोरगरीब उपेक्षित कलाकारांना व्यासपीठ होण्यासाठी चंद्रशेखर कडू पाटील यांनी काँग्रेस कमिटीच्या सांस्कृतिक विभागामार्फत त्यांनी शासकीय पातळीवर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.ते एक अभिनेते कलाकार होते
चेन्नई एक्सप्रेस मध्ये अभिनेते शाहरुख खान बरोबर त्यांनी सहकलाकाराची भूमिका बजावली होती.त्यांच्या अकस्मात निधनाने काँग्रेस कमिटीसह मित्र परिवार व कलाकारांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे