Breaking
ई-पेपर

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आमदार लंघे यांच्या नेवासा येथील पावन गणपती जवळील जनसंपर्क कार्यालयाचा श्री गणेशा….

0 6 0 5 3 3

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आमदार लंघे यांच्या नेवासा येथील पावन गणपती जवळील जनसंपर्क कार्यालयाचा श्री गणेशा….

नेवासा प्रतिनिधी –

अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर नेवासा मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी आणि विविध प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी नेवासा येथे पावन गणपती जवळ आ. विठ्ठलराव लंघे यांचे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले आहे, अशी माहिती आ. विठ्ठलराव लंघे यांनी दिली आहे.

नेवासा तालुक्यातील जाणसामान्य लोकांचे आमदार म्हणून विठ्ठलराव लंघे निवडून आले.

अतिशय सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून निवडून आलेले आ.लंघे हे तळागाळातील माणसात लोकप्रिय असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी मध्यवर्ती कार्यालय नव्हते. काल अक्षयतृतीया या शुभ मुहूर्तावर नेवासा मतदार संघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेवासा येथे पावन गणपतीजवळ मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय त्यांनी सुरु केले.

याप्रसंगी अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावर आ. विठ्ठलराव लंघे यांचे पुतणे संजय पांडुरंग लंघे व त्यांच्या पत्नी अश्विनी लंघे यांनी विधिवत पुजा केली. याप्रसंगी आ. विठ्ठलराव लंघे, डॉ. तेजश्री लंघे, कार्यालयातील प्रमुख आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. नेवासा मध्यवर्ती कार्यालयीन प्रमुख सुनील मोरे मोबाईल-९८६०७७८६८९ यांच्या संपर्क क्रमांकावर जनतेने आपली कामे सांगण्यासाठी संपर्क करावा असे आ. विठ्ठलराव लंघे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे