भाजपाचे तालुका सरचिटणीस माऊली गारुळे बेलपिंपळगाव गटामध्ये आमदार लंघे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेची निवडणूक लढण्यास इच्छुक ……
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
बेलपिंपळगाव गटातील इछु्क उमेदवार म्हणून माऊली गारुळे आमदार विठ्ठलराव लंघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.
विधानसभा निवडणुकीच्या कालखंडामध्ये सौ.रत्नमाला विठ्ठलराव लंघे यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करणारे माउली गारुळे यांनी बेलपींपळगाव गटामध्ये भरपूर मताधिक्य वाढ करत विजया मध्ये मोठा सिंहाचा वाटा असल्याची चर्चा गटामध्ये होताना पहावयास मिळत आहे.
त्याच कामाची पावती म्हणून बेलपिंपळगाव गटामध्ये जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून उमेदवारी मिळावी आसा बेलपिंपळगाव गटातील कार्यकर्त्यां मध्ये तसेच सर्वसामान्य जनते मध्ये जोरदार मागणी होताना दिसत आहे.
या उमेदवारीसाठी बेलपिंपळगाव गटातील माऊली गारुळे यांचे समर्थक आ. विठ्ठलराव लंघे यांची भेट घेऊन माऊली गारुळे यांना बेलपिंपळगाव गटामधून उमेदवारी देण्यासाठी आग्रह करणार आहेत.
तरी बेलपिंपळगाव हा मोठा संवेदिलशील गट म्हणून ओळखला जातो अनेक दिग्गज या गटामध्ये खूप दिवसापासून उमेदवारीसाठी आमदार लंघे त्यांच्याकडे फिल्डिंग लावून आहेत.
त्यातल्या त्यात माऊली गारुळे हे आमदार लंघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात तरी माऊली गारुळे यांना कामाची पावती उमेदवारीच्या माध्यमातून आमदार लंघें कडून मिळणार का हे पाहणे पुढील काळात महत्त्वाचे ठरणार आहे.




