मा.आ. शंकरराव गडाख कट्टर समर्थ संजय नागवडे यांची भेंडा गटातून
जिल्हा परिषदेच्या उमेदवारी करावी यासाठी जनतेतून मागणीचा जोर वाढला….
नेवासा प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील होऊ घातलेले जिल्हा परिषद पंचायत समितीच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या माध्यमातून अनेक उमेदवार वेगवेगळे गटामधून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक आहेत परंतु भेंडागटाचे चित्र पाहता दिघी येथील रहिवासी असलेले तसेच माजी आमदार शंकरराव गडाख यांची कट्टर समर्थक म्हणून यांचे जुने कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले दिघी ग्रामपंचायतचे माजी सरपंच संजय नागवडे यांनी भेंडा गटातून निवडणुकीसाठी उमेदवारी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
संजय नागवडे हे दिघे ग्रामपंचायत मध्ये दहा वर्षांपूर्वी मोठ्या माताने सरपंच म्हणून मताधिक्याने निवडून आले तसेच मा.आ. शंकरराव गडाख पाटील यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे त्यांनी दिघी गावांमध्ये घडवून आणले.
तसेच आ. शंकरराव गडाख यांच्याशी त्यांची स्नेहाचे संबंध असून माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने त्यांना भेंडा गटातून पंचायत समिती सदस्य उमेदवारी करणे संदर्भात अग्रह होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे तशी तयारीही त्यांची भेंडा गटामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
भेंडा गणामध्ये दिघी, भेंडा ,देवगाव ,चिंचोली, शहापूर,गाव तसेच गणामधील सर्वत्र गावामध्ये ते सध्या भेटीगाठीचा दौरा करून सर्वांच्या सुखदुःखामध्ये शुभ कार्य असतील यामध्ये आवर्जून उपस्थिती दर्शवताना पहावयास मिळत आहे.
तसेच त्यांनी आमदार गडाख यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक आंदोलनातील रास्ता रोको असतील व संदर्भातील पेमेंट मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक उपोषणे नेवासा तहसील अहिल्यानगर कार्यालय येथे त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी उपोषणाच्या माध्यमातून नेवासा तालुक्यामध्ये केली आहे त्याच्याच कुठेतरी फायदा त्यांना या उमेदवारीसाठी होऊ शकतो असे बोलले जात आहे.
तरी भेंडा गणामध्ये दिग्गज राजकारणी पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे चर्चा तालुक्यामध्ये होताना पाहावयास मिळत आहे भेंडा गटात मोठा राजकीय वलय असलेला गट म्हणून मानला जातो मोठे दिग्गज नेते या गटामध्ये प्रस्थापित आहेत त्यामध्ये कारखान्याचे संचालक असतील सरपंच, उपसरपंच, यापूर्वी ज्यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लढवून विजय मिळवलेले उमेदवार असतील तसेच नवे जोमाचे ही उमेदवार या गटांमध्ये सध्याला चर्चेमध्ये पहावयास मिळत आहेत यामागे ही भेंडा गावाला उमेदवारी संदर्भात प्रत्येक पंचवार्षिक जिल्हा परिषदेला जोगते माप दिले जाते परंतु खेड्यापाड्यातील कार्यकर्त्यांना उमेदवारी संधी मिळत नसल्यामुळे ती एक नाराजी खेड्यापाड्यातील इच्छुक कार्यकर्त्यांची होताना पाहावयास मिळत आहे तरी ग्रामीण भागात ही जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळणे संदर्भात त्यातल्या त्यातच हे नवे उमेदवार म्हणून दिघी गावचे सुपुत्र माजी सरपंच संजय नागवडे यांची चर्चा गटामध्ये उमेदवारी मिळावी यासाठी जोर धरू लागली
आहे.
तरी उमेदवारीचे चित्र पुढील काळातच स्पष्ट होणार आहे.




