डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे व सौ.वृषालीताई शिंदे यांनी घेतले शनिदर्शन
डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे व सौ.वृषालीताई शिंदे यांनी घेतले शनिदर्शन
नेवासा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा अहिल्यानगर
शनि अमावस्यानिमित्त श्रीक्षेञ शनिशिंगणापूर (ता.नेवासा) येथे शनिवार (दि.२९) रोजी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे व सौ. वृषालीताई शिंदे यांनी चौथऱ्यावर शनीदेवाला तेलाचा अभिषेक घालून शनिअमास्यानिमित्त मनोभावे दर्शन घेतले.

यावेळी नेवासा मतदार संघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे क्षेत्र शनिशिंगणापूर येथे स्वागत करून त्यांचा सत्कार केला.
यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे,पंचगंगा उद्योग समूहाचे प्रमुख प्रभाकर (काका) शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ देसरडा,संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, तालुका प्रमुख संजय पवार प्रताप चिंधे, राजेंद्र मते,सतीश कर्डिले,प्रदीपभाऊ ढोकणे,दत्तात्रेय पोटे,यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




