Breaking
ई-पेपर

अंतःकरणपूर्वक नामजप करणे हाच सोपा भक्तिमार्ग : हभप चेडे महाराज..

0 6 0 5 0 6

अंतःकरणपूर्वक नामजप करणे हाच सोपा भक्तिमार्ग : हभप चेडे महाराज..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

परमार्थमार्गात बाह्य उपचारांपेक्षा अंतःकरणातील भाव महत्त्वाचा आहे. महाशिवरात्रीरात्रीच्या चारही प्रहरात जागे राहून, ध्यान आणि मंत्रांचा जप (ओम नमः शिवाय) यथाविधी तथा अंतःकरणपूर्वक करणाऱ्या भक्ताचे ‘जन्माचे बंधन’ सुटते, म्हणजेच त्याला मोक्ष मिळतो म्हणून नामजप करणे हाच भक्ती मार्ग अत्यंत सोपा आणि प्रभावी मानला जातो असे प्रतिपादन हभप सिताराम महाराज चेडे यांनी केले. नेवासा तालुक्यातील नांदूर शिकारी येथील भगवान महादेवाच्या मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त आयोजित हरिकीर्तनात चेडे महाराज बोलत होते. चेडे महाराजांनी ‘शिवरात्री व्रत करी यथाविधि, भावे पूजी आधी शिवलिंग’ या संत एकनाथ महाराजांच्या अभंगावर भावपूर्ण चिंतन मांडले. संतविचारातच मानवी जीवनाचे कल्याण असल्याने संतविचारांचे आचरण आपण आग्रहपूर्वक केले पाहिजे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. कीर्तनासाठी नवनाथ महाराज मुंगसे, गायनाचार्य सोमनाथ शिरसाठ, मृदंगाचार्य ऋषिकेश महाराज पिचडगावकर, अशोक महाराज लिपणे, भाऊसाहेब महाराज फटांगरे, नानासाहेब महाराज लिपणे, अंकुश शिंदे, हरिभाऊ महाराज शिरसाठ, आसाराम महाराज गवळी, नवनाथ महाराज लिपणे, कारभारी गादे, पोपट महाराज लिपणे, गोरक्ष महाराज लिपणे, रोहिदास महाराज शिरसाठ, विष्णू महाराज शिरसाठ, शिवाजी महाराज राजमाने, बप्पासाहेब महाराज कर्डीले, दगडू महाराज खलाटे, संजय खलाटे यांच्यासह ग्रामस्थ, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————————————-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे