Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरमहाराष्ट्र

*जागतिक योग दिनानिमित्त जि.प. प्राथमिक शाळेत कृषिकन्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

0 8 9 9 8 9

*जागतिक योग दिनानिमित्त जि.प. प्राथमिक शाळेत कृषिकन्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

कुकाणा : दि. २१ – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

जागतिक योग दिनानिमित्त जि.प. प्राथमिक शाळेत योगाभ्यास कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कृषि महाविद्यालय भानसहिवरे येथील कृषिकन्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विद्यार्थ्यांसह विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर केले.
योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही उत्तम राहते, तसेच दैनंदिन जीवनात योगाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना नियमित योगाभ्यास करण्याचे आवाहन करण्यात आले.


महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी संलग्न कृषि महाविद्यालय भानसहिवरे येथील ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत गावात कार्यरत असलेल्या कृषिकन्यांनी शालेय विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि आरोग्य संवर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कृषिकन्या तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी नियमित योगाभ्यासाचा संकल्प करून सर्वांनी निरोगी जीवनाचा संदेश दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे