Breaking
ई-पेपर

*कामिका एकादशीनिमित्त नेवासा भक्तिमय; आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी घेतले ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन*

*‘माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे, भरभरून पाऊस पडू दे’ अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना; हजारो भाविकांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्याने नेवासा दुमदुमला*

0 8 9 9 1 8

*कामिका एकादशीनिमित्त नेवासा भक्तिमय; आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी घेतले ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन*

*‘माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे, भरभरून पाऊस पडू दे’ अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना; हजारो भाविकांच्या उपस्थितीत दिंडी सोहळ्याने नेवासा दुमदुमला*

नेवासा | प्रतिनिधी

आषाढ वद्य एकादशी अर्थात कामिका एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नेवासा नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन वास्तव्याने पुनीत झालेल्या नेवासानगरीत तालुक्यातील विविध गावांतून आलेल्या दिंड्या, भाविकांचा उत्साह आणि हरिनामाच्या गजराने परिसर भक्तिमय झाला. यानिमित्ताने आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी श्री ज्ञानेश्वर मंदिरातील पवित्र पैस खांबाचे दर्शन घेऊन ज्ञानेश्वर माऊलींचे आशीर्वाद घेतले.
यावेळी बोलताना आमदार लंघे पाटील म्हणाले की, आषाढी एकादशीनंतर कामिका एकादशी ही नेवासासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मोठी आध्यात्मिक पर्वणी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वास्तव्य लाभलेल्या या पुण्यभूमीत कामिका एकादशीच्या दिवशी दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने येतात. माऊलींच्या चरणी माथा टेकल्यानंतर वर्षभर सुख, समृद्धी आणि समाधान लाभते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
नेवासा तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावातून दिंडी सोहळे नेवासानगरीत दाखल होत असून लाखो भाविक भक्तिभावाने माऊलींचे दर्शन घेत आहेत. भक्ती, सेवा आणि संस्कृतीचा हा संगम नेवासाच्या धार्मिक परंपरेला अधिक समृद्ध करणारा आहे, असेही आ. लंघे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी ‘माझा शेतकरी राजा सुखी होऊ दे, त्याच्या कष्टाला योग्य फळ मिळू दे आणि यंदा भरभरून पाऊस पडू दे,’ अशी प्रार्थना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी केली. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
कामिका एकादशीनिमित्त भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला.
यावेळी आ. लंघे पाटील यांनी वेदाचार्य ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांचे संतपूजन करून त्यांचे शुभाशीर्वाद घेतले. तसेच मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खिचडी महाप्रसादाचे भाविकांना त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी ह.भ.प. महंत देविदासजी महाराज म्हस्के, श्री ज्ञानेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा माजी आमदार पांडुरंगजी अभंग, नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले, शिवसेना नेते भाऊसाहेब मामा वाघ, सर्व नगरसेवक, शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी, नेवासा तालुक्यातील भाविक भक्त, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हरिनामाचा गजर, दिंड्यांची शिस्तबद्ध मिरवणूक आणि माऊलींच्या दर्शनासाठी उसळलेला भक्तिसागर यामुळे कामिका एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण नेवासानगरीला जणू अध्यात्मिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे