Breaking
ई-पेपर

भेंडा बु ग्रामपंचायतच्या प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मंजूरी पत्राचे लाभार्थ्यांना वाटप.

0 4 6 0 6 5

भेंडा बु ग्रामपंचायतच्या प्रधानमंत्री आवास योजना घरकुल मंजूरी पत्राचे लाभार्थ्यांना वाटप –

भेंडा – (प्रतिनिधी ) महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

नेवासा तालुक्यातील भेंडा बु ” ग्रामपंचायतीच्या महा अवास अभियान 24 – 25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण ) टप्पा २ मधील ७३ लाभार्थ्यांना घरकूल मंजूर झाले आहे . यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थी – विलास ज्ञानदेव चिंधे व खंडु तुकाराम मिसाळ यांना भेंडा बु ग्रामपंचायतच्या उपसरपंच – सौ संगिता नामदेव शिंदे यांच्या हस्ते घरकूल मंजूरीचे पत्र नुकतेच देण्यात आले .
प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत राज्यातील २० लक्ष लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजूरी पत्र व किमान १० लक्ष घरकूल लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरणाचा गृहोत्सवाचा कार्यक्रम २२ फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिव छत्रपती क्रिडा संकूल बालेवाडी पुणे या ठिकाणी पार पडला होता .
यावेळी लाभार्थांना घरकूल मंजूरीचे पत्र उपसरपंच – संगिता नामदेव शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी माजी सरपंच – नामदेव निकम, डॉ लहानु मिसाळ, पत्रकार – नामदेव शिंदे, ग्रा सदस्य –
आण्णासाहेब गव्हाणे, देवेंद्र काळे, येडुभाऊ सोनावणे, दिलीप गोर्डे,कादरभाई सय्यद, दत्तात्रय गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी – रेव न्नाथ भिसे, बाबासाहेब गोर्डे, विष्णु फुलारी, रामभाऊ देशमुख, धोंडीराम भिसे आदी उपस्थित होते .

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 0 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे