Breaking
ई-पेपरकृषीवार्ता

म्हसले गावात कृषिदुतांचे स्वागत..

0 4 4 9 6 3

म्हसले गावात कृषिदुतांचे स्वागत..

नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न मुळा एज्युकेशन सोसायटीचे कृषि महाविद्यालय, सोनईचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी (RAWE & AIA) ग्रामीण कृषी जागरुकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत म्हसले गावात दाखल झाले असून ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. कृषीदूत श्रेयश जावळे, सुमित भोंग, कुणाल डांगे, यश अंबाडे, मनीष गडाख, प्रवीण दहे यांचा समावेश असून ते शेतकऱ्यांना विविध विषयावर मार्गदर्शन तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. गावामध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे ग्रामीण जीवनमान, सामाजिक व आर्थिक स्तर, नैसर्गिक साधन संपत्ती समाजातील सामाजिक स्थिती पीक पद्धती इ. विविध गोष्टीचा अभ्यास करणार आहेत. तया बरोबर शेतकऱ्यांनाही विविध कार्यक्रम व प्रात्यक्षिक दाखविणार आहेत. माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड तंत्रज्ञान, जिवाणू खतांचा शेतीमध्ये वापर, गांडुळखत निर्मिती, पिकांवर येणारे रोग व किडी याची माहिती व व्यवस्थापन, जनावरांची काळजी व संगोपन तसेच शेतीशी निगडित विविध समस्यांवरील उपाय, बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक अशा विविध विषयांवर शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य प्रा. सुनिल बोरुडे, कार्यक्रम समन्वयक डॉ. अतुल दरंदले, कार्यक्रम अधिकारी प्रा. श्रीकृष्ण हुरुळे, डॉ. संतोष चौगुले, डॉ. निर्मला विधाते व इतर विषय तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे .

या प्रसंगी गावच्या सरपंच सौ. कविता किशोर शिरसाठ उपसरपंच श्री.संतराम खंडू रोडगे, ग्रामविकास अधिकारी श्री. काकडे, ग्राम महसूल अधिकारी श्री. एस. बी. जाधव, कृषी सहायक आत्माराम उबाळे, ग्रामपंचायत कर्मचारी रामभाऊ रोडगे व गावकऱ्यांनी कृषीदुतांचे स्वागत केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे