Breaking
ई-पेपर

*माजी विद्यार्थ्याची मातृशाळेसाठी सामाजिक बांधिलकी; जि. प. शाळा देवसडेला १ लाख १० हजारांची देणगी*

0 9 0 0 1 6

*माजी विद्यार्थ्याची मातृशाळेसाठी सामाजिक बांधिलकी; जि. प. शाळा देवसडेला १ लाख १० हजारांची देणगी*

नेवासा तालुका | प्रतिनिधी –

ज्या शाळेने ज्ञानाची पहिली अक्षरे गिरवली, संस्कारांची शिदोरी दिली आणि आयुष्याची पायाभरणी केली, त्या मातृशाळेचे ऋण फेडण्याचा प्रेरणादायी उपक्रम जि. प. शाळा देवसडे तालुका नेवासा येथे पाहायला मिळाला. शाळेचे माजी विद्यार्थी तथा पोलीस विभागात पोलीस सह आयुक्त, ठाणे या महत्त्वपूर्ण पदावर कार्यरत असलेले मा. डॉ. पंजाबराव वसंतराव उगले पाटील यांनी शाळेच्या विकासासाठी तब्बल १ लाख १० हजार रुपयांची देणगी अर्पण केली.
डॉ. उगले पाटील यांनी ही देणगी आपले वडील स्व. वसंतराव उगले पाटील यांच्या स्मरणार्थ शाळेला दिली. आपल्या यशाच्या प्रवासात मातृशाळेचे योगदान कायम स्मरणात ठेवत त्यांनी केलेले हे योगदान सामाजिक बांधिलकीचे आणि कृतज्ञतेचे उत्तम उदाहरण ठरले आहे.
“ज्या शाळेने आपल्याला घडविले, त्या शाळेसाठी काहीतरी देणे हीच खरी कृतज्ञता,” या भावनेतून केलेला हा उपक्रम केवळ आर्थिक मदत नसून आजच्या आणि भावी पिढीतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणेचा संदेश देणारा आहे. शाळा ही केवळ शिक्षण देणारी संस्था नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण, संस्कार आणि स्वप्नांना दिशा देणारी संस्कारभूमी असते. त्यामुळे माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मातृशाळेशी ऋणानुबंध जपत पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे.
डॉ. पंजाबराव उगले पाटील यांच्या या योगदानामुळे शाळेच्या विकासाला निश्चितच बळ मिळणार असून, “माजी विद्यार्थ्यांचे योगदान—शाळेच्या विकासाची नवी दिशा” हा आदर्श अधिक दृढ झाला आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल जि. प. शाळा देवसडे परिवाराच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
वडिलांच्या स्मरणार्थ मातृशाळेला दिलेले हे मोलाचे योगदान आणि आपल्या यशाची नाळ शाळेशी जोडून ठेवण्याची त्यांची भावना सर्वच माजी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे परिसरातून सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे