Breaking
ई-पेपर

*आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “गाव तिथे झाड” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; देवसडे येथे महिलांच्या हस्ते वृक्षारोपण*

0 8 9 9 8 1

*आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त “गाव तिथे झाड” अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; देवसडे येथे महिलांच्या हस्ते वृक्षारोपण*

नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

आमदार श्री. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या “गाव तिथे झाड” या वृक्षारोपण अभियानाला नेवासा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, वटपौर्णिमेच्या पावन निमित्ताने देवसडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरात महिला भगिनींच्या शुभहस्ते वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात वृक्षारोपणासोबतच लावलेल्या झाडांचे जतन व संगोपन करण्याचा सामूहिक संकल्प करण्यात आला. “एक झाड लावा, पर्यावरण वाचवा” हा संदेश देत उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तांबे सर, कोठुळे सर, आसिफ सय्यद, महिंद्र दारकुंडे, योगेशजी पिसोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदर्शन घोडेचोर, मच्छिंद्र मुंगसे तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या “गाव तिथे झाड” अभियानातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचत असून, प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून हरित महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प या अभियानातून अधिक दृढ होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे