*चांदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राहुल दहातोंडे यांची बिनविरोध निवड*

*चांदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राहुल दहातोंडे यांची बिनविरोध निवड*
सोनई प्रतिनिधी : मोहन शेगार
नेवासा तालुक्यातील चांदा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राहुल गोवर्धन दहातोंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड प्रक्रिया माजी अध्यक्ष अण्णासाहेब दहातोंडे यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत शांततापूर्ण आणि सलोख्याच्या वातावरणात पार पडली. राहुल दहातोंडे यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचीही निवड करण्यात आली. त्यामध्ये विक्रम थोरात, सुनील अर्जुन जावळे, अझहर हमीद शेख, संतोष एकनाथ भालके यांचा समावेश आहे. महिला प्रतिनिधी म्हणून मनिषा बाबासाहेब पासलकर, सुजाता प्रशांत दहातोंडे, मुस्कान शेख, प्रियंका वैभव जावळे आणि राधिका देविदास सातपुते यांची निवड करण्यात आली. शिक्षकप्रेमी तज्ज्ञ म्हणून बाळासाहेब मच्छिंद्र दहातोंडे, तर शिक्षक प्रतिनिधी म्हणून श्रीमती शांता मरकड-दहातोंडे यांची निवड झाली.
निवडीनंतर उपस्थित पालकांनी नवनियुक्त अध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन करून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम राबविणे, तसेच शाळेतील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी समितीने प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. नव्या समितीच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या निवड प्रक्रियेस गोरखनाथ दिवटे, किरण जावळे, चंदकांत जावळे, देविदास पासलकर, नासीर सय्यद, विष्णू बेल्हेकर, निलेश पंडित, बाळासाहेब जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय जावळे, शिक्षक बनकर, गोसावी, जऱ्हाड, श्रीमती शांता मरकड-दहातोंडे, गर्जे, पुरी तसेच अन्य शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते. सर्वांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. शाळेचा सर्वांगीण विकास, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी समिती एकजुटीने कार्य करेल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.



