मुळा एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्नीक शाखांना मान्यता..
संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांची माहिती...

मुळा एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्नीक शाखांना मान्यता..
संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांची माहिती…
सोनई प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या मुळा एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सोनई या महाविद्यालयाला वर्ष २०२५-२६ -करीता पॉलिटेक्नीक (तंत्रनिकेतन) च्या खालील शाखांना AICTE नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांची मान्यता मिळाल्याची माहिती संस्थेचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी दिली
यामध्ये कॉम्प्युटर इंजीनियरिंग,आर्टिफिशीअल इंटेलिजन्स अॅण्ड मशीन लर्निंग,इलेक्ट्रॉनिक अॅण्ड टेली कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हे अभ्यासक्रम उपलब्ध असणार आहेत
४० वर्षाची परंपरा असलेल्या मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये यावर्षी पासुन वरील शाखा सुरु होत आहेत.
१० वी नंतर पॉलिटेक्निक इंजिनिअरींगला प्रवेश घेतल्यास ११ वी व १२ वी करतांना JEE व MH-CET या स्पर्धात्मक परिक्षा देण्याची गरज नाही.पॉलिटेक्निक डिप्लोमा झाल्यानंतर IT कंपन्यांमध्ये थेट नोकरी मिळू शकते.किंवा इंजिनिअरींग कॉलेजला डायरेक्ट द्वितीय वर्षाला अॅडमिशन मिळू शकते.
जे विद्यार्थी १२ वी उत्तीर्ण झालेले आहेत,परंतु मार्क कमी असल्यामुळे इंजिनिअरींगला प्रवेश मिळू शकला नाही अशा विद्यार्थ्यांना सुध्दा पॉलिटेक्निक कॉलेजला प्रवेश घेवुन त्यांचे इंजिनिअर होण्याचे स्वप्न पुर्ण करता येईल.
सोनई सारख्या ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख मार्गदर्शनाखाली अनुभवी व पात्रता असलेले शिक्षकवृंद व त्यासाठी लागणाऱ्या अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवर्गानुसार स्कॉलरशिपची सुविधा तसेच मुलींना शासनाच्या नियमाप्रमाणे मोफत शिक्षण सुविधा सुध्दा उपलब्ध असल्याचे गडाख यांनी सांगितले…
……………….,…………………,……………………
सोनई सारख्या ठिकाणी
कॉम्प्युटर इंजिनियरिंग,आर्टिफिशिअल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग,इलेक्ट्रॉनिक अँड टेली
कम्युनिकेशन,इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी
या कोर्सला मान्यता मिळाल्याने.
ग्रामीण भागातील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्या शिक्षणाची सोय होणार आहे…