
पाथरवाला येथे महिला संवाद मेळावा संपन्न.
कल्याणकारी योजनाचा लाभ घेण्याचे मुरकुटे यांचे आवाहन…
कुकाणा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महिलांनी शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनाचा लाभ घ्या असे आवाहन शक्ती संवादिनी महिला अध्यक्ष आशाताई मुरकुटे यांनी केले, तालुक्यातील पाथरवाला येथे संवाद मेळाव्याच्या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शकुंतलाताई डोईफोडे या होत्या प्रसंगी व्यासपीठावर भाजपच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष भारतीताई बेंद्रे, उपसरपंच स्वातीताई खाटीक,मंगलताई काळे,अनिताताई ढोकणे,हिराबाई थोरे, मीराबाई थोरे,जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर,तालुका उपाध्यक्ष सोमनाथ कचरे आदी उपस्थित होते.
प्रसंगी पुढे बोलताना आशाताई मुरकुटे म्हणाल्या आमदार बाळासाहेब मुरकुटे साहेब यांच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील महिलांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळऊन देण्यासाठी आपण पूर्ण तालुक्यात काम करत असून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू,विरोधकांच्या भूलथापाना बळी पडू नका, पोकळ आश्वासन देणारे सध्या तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील, परंतु आपण
महिलांना आर्थिक सक्षम करण्याचा हेतू ठेवून काम करत राहू असे मुरकुटे म्हणाल्या.
या प्रसंगी
संभाजी खाटीक,अमोल खाटीक,अण्णासाहेब खाटीक, संतोष खाटीक,शिवनाथ खाटीक, निवृत्ती खाटीक, सुदाम थोरे, भावराव खाटीक आदी सह गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.