प्राथमिक शाळा देवसडे येथे बालआनंद मेळावा उत्साहात..
प्राथमिक शाळा देवसडे येथे बालआनंद मेळावा उत्साहात..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
जि. प. प्राथमिक शाळा देवसडे येथे बालआनंद मेळावा अंतर्गत विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री अनुभव येण्यासाठी भाजीपाला व खाद्यपदार्थांचा बाजार भरण्यात आला.
या उपक्रमास पालकांचा विशेषता महिलांचा तरुण वर्गाचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, सर्व विद्यार्थ्यांनी आणलेल्या सर्व पदार्थांची अवघ्या दीड तासात विक्री झाली.
या उपक्रमामध्ये जवळपास ११ हजार रुपयांच्या पुढे उलाढाल झाली.
केंद्राच्या केंद्रप्रमुख श्रीमती लाटे तसेच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदर्शन घोडेचोर बबनराव पिसोटे, सोपान घोडेचोर,अभिजित उगले, कल्याण काळे, नवनाथ घोडेचोर, सचिन घोडेचोर उपाध्यक्ष सिद्धार्थ दळे, ऋषिकेश म्हस्के, अप्पासाहेब पिसोटे, दाविद मिसाळ, भारत मंडलिक,मिलिंद घोडेचोर, विजय जाधव, संतोष सरोदे, असिफ सय्यद,गणेश काळे,सुनील घोडेचोर,मधुकर सरोदे,तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक संघातील सदस्य आदिनी
शाळेतील आनंद मेळाव्यास भेट देऊन भाजीपाला खरेदी केला व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.

सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील मुख्यध्यापक शरद तांबे, भारत कोठुळे शिक्षिका श्रीमती भोगे तसेच गावातील सर्वांनी सहकार्य केले. सर्व पालकांनी, ग्रामस्थांनी या उपक्रमात सहभाग घेऊन हा उपक्रम यशस्वी केला.





