*”अथक परिश्रमाला यशाची पावती”* *जागर रील महोत्सव २०२६ मध्ये ड्रीम सिनेमा प्रोडक्शनला द्वितीय क्रमांक*
*”अथक परिश्रमाला यशाची पावती”*
*जागर रील महोत्सव २०२६ मध्ये ड्रीम सिनेमा प्रोडक्शनला द्वितीय क्रमांक*
सुरेगाव गंगा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
: अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाने आयोजित केलेल्या “जागर रील महोत्सव २०२६” या सामाजिक जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस मुख्यालय कार्यालय, अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत नेवासा तालुक्यातील ड्रीम सिनेमा प्रोडक्शन या टीमने द्वितीय क्रमांक पटकावत मानाचा गौरव पुरस्कार प्राप्त केला.
“अथक परिश्रम, जिद्द आणि संयम यांची साथ असेल, तर यशाला तुमच्या पायाशी नतमस्तक व्हावेच लागते” या उक्तीला साजेल असा हा क्षण होता.
या कार्यक्रमाला मा. मुमक्का सुदर्शन, (पोलीस अधीक्षक), अहिल्यानगर सह श्री वैभव कलुबर्मे, डॉ. दिलीप टिपरसे हे पोलीस अधिकारी आणि अ.नगर सायक्लिंग क्लबचे संस्थापक माननीय श्री. गौरव फिरोदिया सर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व कलाकारांचा गौरव प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी सर्व कलाकारांच्या सामाजिक जनजागृतीच्या कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशस्वी टीमचे निर्माते मा. श्री. विनोद बनकर असून, टीममध्ये किरण डहाळे, दिनेश सरगय्ये, प्रणव डहाळे, सिद्धार्थ नागपुरे, उमेश डहाळे, नितीन धुमाळ सुरेगाव (गंगा) आदि. कलाकारांचा समावेश आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी टीमचे निर्माते श्री. विनोद बनकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले व सर्व कलाकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.




