श्री आनंद गोपाळनाथ पायी दिंडी सोहळ्याचे श्रीक्षेत्र सलाबतपुर गोपाळनाथ नगर ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडीचे शनिवारी प्रस्थान…
श्री आनंद गोपाळनाथ पायी दिंडी सोहळ्याचे श्रीक्षेत्र
सलाबतपुर गोपाळनाथ नगर ते श्री क्षेत्र पंढरपूर दिंडीचे शनिवारी प्रस्थान…
नेवासा प्रतिनिधी – मंगेश निकम
श्री आनंत गोपाळनाथ पायी दिंडी सोहळ्याचे श्रीक्षेत्र सलाबतपुर गोपाळनाथ नगर ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे शनिवार दिनांक 6/ 7/ 2024 रोजी प्रस्थान होणार आहे….. अशी माहिती दिंडी चालक पोपटराव मधुकर निकम पाटील यांनी दिली आहे …..
त्यांनी दिंडीच्या पोम्प्लेट मध्ये म्हटले आहे की शनिवार दिनांक ६/७/२०२४ रोजी श्रीक्षेत्र सलाबतपुर (गोपाळनाथ नगर )ते श्रीक्षेत्र पंढरपूर आषाढी पाई दिंडी सोहळ्याचे प्रस्थान वैकुंठवासी सद्गुरु किसनगिरी बाबा तसेच
ह. भ .प वैकुंठवासी बन्सी महाराज तांबे यांच्या कृपाशीर्वादाने तसेच ह .भ .प गुरुवर्य प.पु भास्करगिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड देवस्थान तसेच महंत स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने मी ती आषाढ शु||1|| आ.१९४६ शनिवार दिनांक ६/७/२०२४ ते मिती आषाढ शु.९ शके १९४६ सोमवार दि.१५/०७/२०२४ पर्यंत संपन्न होत आहे.
तरी श्री अनंत गोपाळनाथ भजनी मंडळ ग्रामस्थ व पंचक्रोशीतील महाराज भजनी मंडळी यांची दिंडी सोहळ्यात उपस्थिती राहून भजन व कीर्तनाचा आनंद घेत पांडुरंग दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आव्हान दिंडी चालक पोपटराव मधुकर निकम, तसेच तानाजी बोरुडे, तसेच रावसाहेब निकम यांनी केली आहे.
या दिंडीचा प्रवास दहा दिवसाचा असून या दिंडीचे हे पहिले वर्ष आहे या दहा दिवसाच्या प्रवास त्यामध्ये टाळ ,मृदुंग ,हरिनामाचा गजर करीत वारकरी देहभान विसरून विठुरायाच्या दर्शनाचे साठी आनंदाने पायी चालत असतात दिंडी सोहळ्यामध्ये दररोज पहाटे काकडा, भजन, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व महाआरती व रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन सेवा संपन्न होणार आहे .अशा प्रकारचे दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत दिंडीमध्ये वारकऱ्यांना दररोज चहा, नाश्ता ,तसेच दुपारी व रात्री अन्नदान व्यवस्था दानशूर भाविकांना केली आहे.
हा दिंडी सोहळा देडगाव ,तिसगाव ,माणिकदौंडी, केरूळ तालुका आष्टी, खडकत ,जातेगाव ,गुळसडी ,तालुका करमाळा, दहिवली ,परिते ,पंढरपूर या ठिकाणी करत अशाप्रकारे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
दिंडी सोहळ्यासाठी विशेष सहकार्य म्हणून ह.भ.प भागचंद महाराज पाठक, ह.भ.प गणेशानंदगिरीजी महाराज नजीक चिंचोली, ह .भ. प. दिनकर महाराज मते गोगलगाव, ह.भ. प .साहेबराव महाराज चावरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
तसेच दिंडी काळामध्ये मृदंगाचार्य म्हणून गणेश नाना तांबे, श्री योगेश तानाजी बोरुडे ,श्री बाबू पाठे, हे असणार आहेत.
तसेच हार्मोनियम वादक म्हणून श्री शिवाजी गोरे जळके,विणेकरी म्हणून रावसाहेब पाटील निकम तसेच रथ ट्रॅक्टर सौजन्य दत्तात्रय गणपत निकम, पाणी जार सौजन्य गुरुदत्त ऐकवा सलाबतपुर श्री निकम बंधू तसेच साऊंड सिस्टिम श्री एकनाथ पाटील शेळके गळलिंब तसेच पंचक्रोशीतील गुनिजन भजनी मंडळ या दिंडी सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.
या दिंडी सोहळ्यामध्ये नियम व अटी खालील प्रमाणे असतील.
1. दिंडीत येताना स्वतःचा गरजेच्या वस्तू बरोबर आणाव्यात.
2. दिंडीचे नियम श्री क्षेत्र देवगड दिंडीप्रमाणे असतील.
3. पुरुषांना पांढरा गणवेश आवश्यक आहे.
4. दिंडीत येताना सर्व कार्यक्रमास हजर राहावे लागेल
5. दिंडी स्वतःची जबाबदारी स्वतःच घ्यावी लागेल
6. दिंडीत गैरवर्तणूक आढळल्यास दिंडीतून बाहेर काढण्यात येईल
7. वृद्ध व लहान मुलांना दिंडीत प्रवेश दिला जाणार नाही अशा प्रकारचे नियमावली दिंडीच्या परिपत्रके मध्ये नमूद केली आहे.
तसेच दिंडी जाहिरात सौजन्य सौ.सविता कैलास पाटील झगरे पंचायत समिती सदस्य नेवासा व श्री कैलास पाटील झगरे सरपंच जळके बुद्रुक यांचे आहे.