Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

साखर कामगारांना 40टक्के वेतनवाढी साठी त्रीपक्ष समितीची मुंबईत बैठक पार.

0 4 0 5 3 3

साखर कामगारांना 40टक्के वेतनवाढी साठी त्रीपक्ष समितीची मुंबईत बैठक पार.

सोनई- //वार्ताहर // – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

साखर कामगारांच्या वेतनवाढ व इतर प्रलंबित प्रश्नांसाठी गठीत केलेल्या त्रिपक्ष समितीची बैठक बुधवारी मुंबईत पार पडली. या बैठकीत साखर कामगारांच्या प्रश्नावर समाधानकारक चर्चा झाली.साखर कामगार संघटनेने ४० टक्के वेतनवाढीची मागणी केलेली आहे. यामुळे सध्या साखर कारखान्यांत कामगारांचे थकीत वेतन इत्यादी बाबतची माहिती संकलित करून पुढील बैठकीस सादर केली जाईल महिना अखेरीस परत बैठक आयोजित करण्याचे यावेळी ठरले.
त्रिपक्ष समितीच्या बैठकीस समितीचे अध्यक्ष पी.आर.पाटील, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, जयप्रकाश दांडेगावकर, माजी मंत्री राजेश टोपे, संगमनेर कारखान्याचे चेअरमन प्रताप ओव्हाळ , खाजगी कारखान्याचे प्रतिनिधी अविनाश जाधव. कामगार संघटनेचे प्रतिनिधी तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले,राऊ पाटील, अविनाश आपटे, आनंदराव वायकर,पी.के.मुडे, सत्यवान शिखरे, शिवाजी औटी, प्रदीप बनगे, राजेंद्र तावरे, डी एम निमसे, युवराज रणवरे मुळा कारखाना साखर कामगार युनियन चे अध्यक्ष अशोकराव पवार तर शासन प्रतिनिधी त्रिपक्षीय समिती चे सदस्य सचिव कामगार कल्याण आयुक्त रविराज ईळवे साखर आयुक्त कुणाल खेमनर हे ऑनलाईन बैठकीस हजर होते तसेच कामगार आयुक्त मुंबई हे उपस्थित होते यानंतर किमान चार बैठकीमध्ये वेतनवाढ व इतर मागण्याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल असे सर्वानुमते ठरले या चारही बैठका फेब्रुवारी अखेर घेण्याचे ठरले या बैठकीत साखर उद्योगा पुढील अडचणी व साखर कामगाराचे वेतन वाढ व प्रलंबित प्रश्नावर सविस्तर चर्चा समाधान कारक झाले नंतर सभेचे कामकाज संपविण्यात आली व पुढील बैठकीचे वेळ तारीख ठिकाण समितीचे सदस्य सचिव सर्वाना कळवतील .

4/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे