्धनगरवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरातील मूर्तीसाठी लाडक्या बहिणीचे एक महिन्याचा हप्ता आणखी मदतीचे आव्हान.
्धनगरवाडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरातील मूर्तीसाठी लाडक्या बहिणीचे एक महिन्याचा हप्ता आणखी मदतीचे आव्हान.
सोनई/वार्ताहर – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील सोनई जवळील धनगरवाडी येथे धनगर समाजाचे आशास्थान बाळूमामा व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिराचे काम सुरू आहे आता हे काम जवळ जवळ पूर्णत्वास येत आहे आता यामध्ये मूर्ती बसवणे बाकी असल्याने धनगरवाडी येथील 22 महिलांनी एकत्र येऊन राज्य शासनाच्या वतीने महिलांना लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये दिले जात आहे येथील महिलांनी संत बाळूमामा मंदिरात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती बसवण्याची कल्पना सुचली या मूर्तीसाठी येणाऱ्या खर्च म्हणून येथील बावीस महिलांनी वर्गणी गोळा केली येणाऱ्या मूर्तीसाठी एक महिन्याचे पंधराशे रुपये दिले असून अजून मूर्तीसाठी पैशाची आवश्यकता असल्याने महिलांच्या वतीने मदतीचे आव्हान करण्यात आले आहे धनगर समाजाचे संत सद्गुरु बाळूमामा व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिराचे धनगरवाडी येथे लोकवर्गणीतून सध्या काम सुरू आहे मंदिराचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून आता या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे बाकी असल्याने लाडक्या बहिणीच्या रूपाने धनगर समाजाचे आराध्य दैवत असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीसाठी तांबे वस्ती व वीरकर वस्तीवरील महिलांनी आपल्या लाडक्या बहिणी योजनेतील प्रत्येकी एक हप्ता संक्रांतीच्या मुहूर्तावर जमा करून या बाळूमामाच्या मंदिरामध्ये अहिल्यादेवीची मूर्ती बसवण्याची कल्पना मांडली त्यास या वस्तीवरील 22 महिलांनी एक हप्त्याची रक्कम दिल्याने व अजून कमी पडणारी रक्कम वर्गणीच्या रूपाने गोळा ज्यांना मदत करायची आहे त्यांनी सद्गुरु संत बाळूमामा ट्रस्ट व भजनी मंडळ धनगरवाडी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे