Breaking
ई-पेपर

महिलांनी सामाजिक जीवनात अग्रेसर राहावे -: मा सभापती सुनीताताई गडाख

शिरेगावमध्ये महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन.

0 6 0 5 3 8

महिलांनी सामाजिक जीवनात अग्रेसर राहावे -:
मा सभापती
सुनीताताई गडाख .
शिरेगावमध्ये महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन.

नेवासा प्रतिनिधी –

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत खरवंडी क्लस्टर मधील शिरेगाव येथील प्रार्थना महिला ग्रामसंघाची शिरेगाव येथे प्र बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये ग्रामसंघ ऑफिस उद्घाटन माजी सभापती पंचायत समिती नेवासा सौ सुनिताताई शंकरराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गडाख यांनी महिलांना बचत गट व त्याचे फायदे व्यवहार ज्ञान यावर मार्गदर्शन केले, महिला भगिनी चालू घडामोडीवर लक्ष ठेवले पाहिजे, आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर असून आपण सतर्क राहिले पाहिजे विश्वास व्यक्त केला,
उपस्थित महिलांना ,दशसुत्री, हमारा धन हमारा हिसाब मोहिमे अंतर्गत एस एच जी, व्ही ओ ऑडिट, व रजिस्टर तपासणी, शाश्वत उपजिवीका, सी आय एफ मागणी अर्ज, सी आय एफ निधी वापर व परतफेड, बीज भांडवल, सी एम इ जी पी योजना, इ. बद्दल तालुका अभियान व्यवस्थापन अर्जुन सोनवणे, क्लस्टर प्रमुख नितीन पंडित यांनी चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास सरपंच निरंजन तुवर, सी आर पी मनिषाताई बोर्डे, सविता शिंदे, सुनीता भालेराव, माजी सरपंच रत्नाकर बोर्डे, डॉ संजय तुवर, सुभाष जाधव , अविनाश जाधव आदी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 3 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे