Breaking
ई-पेपर

*विधानमंडळ उपविधान समितीचा शनि शिंगणापूर दौरा; समिती सदस्यांनी घेतले शनी दर्शन*

0 8 9 9 1 8

*विधानमंडळ उपविधान समितीचा शनि शिंगणापूर दौरा; समिती सदस्यांनी घेतले शनी दर्शन*

नेवासा (प्रतिनिधी) : –

महाराष्ट्र विधानमंडळाच्या उपविधान समितीने गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) शनि शिंगणापूर येथे भेट देत शनी महाराजांचे दर्शन घेतले. आमदार प्रतापराव चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीचा राज्य दौरा सुरू असून, या दौऱ्यादरम्यान समितीच्या सदस्यांनी शनि शिंगणापूर येथे धार्मिक विधी व दर्शनाचा लाभ घेतला.
समितीतील सदस्यांनी प्रथम उदासी महाराज मठात अभिषेक केला. त्यानंतर शनी चौथऱ्यावर जाऊन शनी मूर्तीवर तेल अभिषेक करून मनोभावे दर्शन घेतले.
यानंतर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात समितीचे अध्यक्ष आमदार प्रतापराव चिखलीकर तसेच समिती सदस्य सुधीर गाडगीळ यांचा आमदार विठ्ठलराव लंघे आणि देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमुका सुदर्शन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर पोलीस ठाण्याचे दीपक धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
विधानमंडळ उपविधान समितीच्या या दौऱ्यामुळे शनि शिंगणापूर देवस्थानच्या विविध बाबी, प्रशासनिक व्यवस्था आणि भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांच्या अनुषंगानेही पाहणी व चर्चा होण्यास महत्त्व प्राप्त झाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे